Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- अंक ४ था. १५३ बाळकृष्णास श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे मांडीवर ठेवितात. सर्व संत पुढे होऊन बाळकृष्णाचे मुखाकडे पाहून डोळ्यांस पदर लावून तोंडे खाली घालून उभे राहतात. श्रीज्ञानेश्वरमहाराज बाळकृष्णाचे तेहाकडे पाहून सद्गदित होतात. ) ज्ञानेश्वर-हे सुकुमारा बाळा! तू आह्मांला बोलावू आलास, तेव्हां तूं साक्षात् गोकुळवासी श्रीकृष्ण प्रभूच आमच्या भेटी आलास असे किरे आह्मांला वाटले ! आणि साक्षात् रुक्मिणीवरानेच आज आम्हांला प्रसादाचे आमंत्रण दिले, अशी भावना पोट धरून, आम्हीं मोठ्या आशेने प्रसादाकरितां येथे धांवत आलों ! असे असून, हे गोपाळकृष्णा, आम्ही येण्यापूर्वीच तूं आह्मांला सोडून निजधामाला कसारे गेलास ! आमची तू एवढा वेळ आतुरतेने वाट पाहिलीस आणि आह्मांला यायला उशीर लागला, ह्मणून कारे आम्हांवर रुसून तू वैकुंठभुवनीं परत गेलास ! हे गुणसमुद्रा, आह्मांवर असा रुस्तुं नकोस रे ! यावेळी तू जर आह्मांवर असा रुसलास, तर आमच्या तोंडाला काळोखी किरे लागेल ! अहो, श्रीमद्भीमातीरविहारा पुंडलीकवरदा पांडुरंगा ! हे तुम्ही काय हो केले ? अहो विश्वजीवना करुणार्णवा महाविष्णु, तुह्मांला हे कसे हो रुचलें ! अहो श्रीधरा, गोविंदा, आह्मां दीनभक्तांवर तुह्मी हा काय हो घोर प्रसंग आणला ! अहो शेषशाई, विश्वंभरा, दीनबंधो, आह्मां भक्तांचा लौकिक तुम्ही असाच काहो वाढविणार ? अहो चतुर्दशलोकपालना पुराणपुरुषा, आमच्या शुद्ध भक्तीला वश होऊन, तुम्ही आमच्या सान्निध नित्य राहतां, ह्मणून त्रिभुवन आह्मांला धन्य किहो समजतात ! आणि हीच भावना मनीं धरून या राजश्रेष्ठाने, या मातोश्रीने आणि या सुंदर सुकुमार बालकाने आमचा गौरव करून, आह्मांला येथे आणिलें ! आणि हे शुद्ध निरंजना, विश्वेशा, येथे जर ही अशी विपरीत गत झाली, तर आम्ही तुझे भक्त द्वाड आहों, असा आमच्या अपकीर्तीचा इका त्रिभुवनीं गाजून, आह्मांला पाहून सगळे लोक भिऊन पळून किरे जातील! हे सच्चिदानंदा, अनंता, आमच्या आगमनाने