अंक ४ था. १४१ हट्ट सोडीनात ! तेव्हां न्हायला उशीर होईल ह्मणून यांना खाली घेऊन यायला मी गच्चीवर चढू लागले! तेव्हां माझ्या हाती सांपडू नये ह्मणून हे गच्चीच्या सज्जावर इकडे तिकडे पळू लागले! नी मी अर्ध्या पाय-या चढून गेलें नाहीं तोच, त्या धांदलींत यांचा पाय घसरून हे गच्चीवरून खाली पडले ! नी यांची ही अशी अवस्था झाला ! बाईसाहेब ! अशा रितीनं मी चांडाळीण आज या अनर्थाला कारण झालें ! नी माझ्या तोंडाला जन्माची का ळोखा लागली ! सीताबाई-तान्ह्या ! अशी कशी रे तुला दुर्बुद्धि सुचली ! कमळे, कायग विद्रूप कळा याच्या तोंडावर आली ही ! माझी कमर खचली ग ! मला भोवळ येते आहे ! देवा! ( असे ह्मणतां ह्मणतां सीताराई बेशुद्ध होते. तिला गिरजा सावरते व तिच्या डोळ्यांस पाणी लावते. ) | कमळा-( सीताबाईस पंख्याने वारा घालतां घालतां ) वाईसाहेब ! अहो बाईसाहेब ! गिरजे, कसं करावं ग बाई आतां ? महाराजांची इकडे ही अवस्था नी बाईसाहेबही यावेळी अशा बेशुद्ध झाल्या ! गिरजे असं मीं कोणतं ग पातक केलं होतं, कीं देवानं अशा त-हेनं ही हत्या माझ्या माथी लोटली ! गिरजा- कमळाबाई, तुमच्याकडे याचा कांहीं बोल नाहीं ! अहो ! हा किनई, महाराजांना झालेल्या घोर साधुशापाचा ठोका आला बरं ! सीताबाई- ( साधुशाप हे शब्द ऐकून दचकून उठून ) साधुशाप ! खरंच ग खरंच ! कमळे, साधुशापच हा वठला बरं बाई ! ( बाळकृष्णाचे चुंबन घेऊन ) बाळा ! सर्वगुणसंपन्नराजसावेळकशीपातली । रुधिरेन्हालेआंग सर्वहीप्रेतकळामुखींआली । नेत्रतेजतेनष्टजाहलेंशुद्ध नमुळींराहिली । प्राणविसाव्याआर्द्रततूतुझीघर्मानेजाहली । साधुमुखींचीशापउक्तिजीकर्णीम्याऐकिली । हाय ! हाय ! रे ! दैवा ! कैशीसत्यठरूघातली । घेतलातुलाअंकीं। पाहीनेत्रउघडून । रोगसर्वसोडी।
पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/149
Appearance