Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र अंक ४ था. कौरवांचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले ! गोपाळांच्या हृदयांत देवकीनंदन श्रीकृष्ण प्रभु होता, ह्मणून त्यांच्यापुढे कोणाचेही कांहीं चाललें नाहीं ! प्रल्हादाच्या हृदयांत गोविंद होता आणि सीतामातुश्रीच्या हृदयांत प्रभु रामचंद्र होते. ह्मणून त्यांना कशापासूनही बाधा झाली नाहीं ! सर्व लंकेचे अग्नीने दहन केले, पण ज्याच्या हृदयांत अखंड श्रीरामप्रभु तिष्ठत होते, अशा बिभीषणाचें घर अग्नीला जाळवलें नाहीं ! आपल्या हृदयांत सच्चिदानंद प्रभु सदा बसत असतां आपल्यापुढे कोणाचे काय चालणार ? अहो ज्ञानराजा, माझ्या मातोश्रीने मला तुमच्या चरणाचा स्नेह बालपणापासून लावून दिल्यामुळे तुमच्या चरणदर्शनाची मी वाट पहात होते ! तुह्मां समर्थांचे चरण आज माझ्या दृष्टीस पडल्याने, तुमचे चरण आणि माझे मन, ही दोन्ही एकत्र करून, मी त्यांचा दृढगांठ दिली आहे ! ह्मणून अहो ज्ञानराजा, हे तुमचे चरण मी आतां कधीही सोडणार नाहीं ! | सीताबाई-( श्रीज्ञानेश्वरमहाराज'स पुन्हा नमस्कार करून ) सद्गुरुसमर्थांनी कृपावंत होऊन या माझ्या तान्ह्याची एवढी आस पुरवावी, हेच माझं समर्थचरणी लीन होऊन मागणं आहे ! आम्ही दीन, पातकी आहों ! आम्ही अधम, अमंगळ, अनंत अपराधी आहों, ह्मणून आमचा अव्हेर करून समर्थनी आम्हांला मोकलून लावलं, तर पतितपावन हैं जें समर्थाचं बीट त्या ब्रीदाला बोल लागेल ! आमच्या कोटि अपराधांकडे पाहन जर समर्थ आह्मांला पाठमोरे झाले, तर आमचा सांभाळ कोण करील ? अहो सङ्गुरुनाथा, महाराजांच्या दुष्कृत आहाळानं सर्व नगर होरपळून गेलं आहे! अशा वेळी सर्व प्रजाजनांचा ताप निववून त्यांना सुखी करणार समर्थावांचून अन्य कोण आहे ? तुह्मी माझे आईबाप, म्हणून तुमचा आस धरून या माझ्या बाळाला बरोबर घेऊन मी समर्थाचे चरणीं धांव घेतली आहे ! तरी समर्थांनी या आपल्या धर्माच्या लेकीला पाठीशी घालून हिचं संकटीं रक्षण करावं ! समर्थांच्या दर्शनानं महाराजांच्या चित्तास निवृत्ति येईल. समर्थांचं हें प्रसन्नमुख पाहून महाराजांचा मीपणा जाऊन त्यां १२ ।