३ अंक ४ था. १२३ णांत साधुसंतांबद्दल सांप्रत अप्रीति उत्पन्न झाली असून, प्रत्यहीं अनेक साधुसंत क-हाडनगरीत राजाज्ञेनें सुळावर जात आहेत, म्हणून मी त्यांना सांगितलें ! तेव्हां त्यांनी माझी प्रार्थना मान्य केली आणि तेथेच शिबिरें देऊन राहण्याचे त्यांनी ठरविलें ! आणि मला ह्मणाले, तुला सीताबाई ठाऊक आहेत काय ? यावर मीं हो झटले. तेव्हा ते मला ह्मणाले, मी अलंकापुरीचा ज्ञानदेव, त्यांच्या दर्शनाकरितां आलो आहे; तर कृपा करून येथवर येऊन मला दर्शन देऊन जावे, असा माझा निरोप त्यांना कळीव ! तेव्ह मीं कळवितो असे म्हणून त्यांचे चरणीं मस्तक ठेविले आणि त्या संतश्रेष्ठांचा निरोप बाईसाहेबांना सांगण्याकरिता मी तसाच मुद्दाम माघारी फिरलों ! श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा निरोप वाईसाहेबांच्या कानांवर मी आत घातला आहे, तरी राजकार्याकरिता निघून जाण्याची मला अनुज्ञा असावी ! ( सोनाबाई मानेने बरे ह्मणून सुचविते व सेवक निघून जातो. ) | तिसरा ब्राह्मण- देवी, अशा संकटसमयीं, हे साक्षात् लक्ष्मीकांत श्रीविष्णूच तुला संकटमुक्त करण्याकरिता आणि आह्मां सर्वांचा उद्धार करण्याकरितां धांव घेत इकडे आले आहेत, असे समज ! तर आतां विलंब न करतां, युवराजाला बरोबर घेऊन, त्या संतश्रेष्ठांच्या दर्शनाला जा, आणि त्यांच्या ओटींत युवराजाला घाल! ह्मणजे सकल आरटांतून तू मुक्त होशील ! बाळकृष्णा- आई ग, आजोबांनी ज्या जगदुरुंची सेवा तुला करावयास सांगितली आहे, ज्यांचे स्वरूप ध्यानी आणून, नित्य प्रातःकाळीं ज्यांच्या नांवाचा तू सहस्रजप करीत असतेस, ज्यांच्या अद्भुत लीला मला सांगून ज्या श्रेष्ठांचे नांव मजकडूनही दिवसांतून तू दहापांच वेळा घेववीत असतेस, तेच का ग हे श्रीज्ञानेश्वरमहाराज ? सीताबाई- बाळा, तेच हे जगद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराज बरं ! बाळकृष्णा- आई, तर मग मला त्यांचे एकदां दर्शन करव ग! चल, आपण त्या जगद्गुरुंच्या शिबिराला जाऊ ! त्यांची ई
पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/131
Appearance