अंक ४ था. ११५ भगवंतांचा स्तव क लागला ! धुवबाळानं केलेला भगवंतांचा स्तव तुम्हीं काल थोडासा वाचला, नी आज त्याच्यापुढे वाचायचा आहे ! कां ? खरंना पण ? सांगितलंना मी बरोबर ! सीताबाई- कमळे, अगदी बरोबर सांगितलंस ! काल ध्रुवबाळानं शेवटीं भगवंतांना असं म्हटलं की, हे देवा ! तू साक्षात् कल्पतरु असं असून, देहादिकांनी भोगण्यास योग्य, अशीं सुख जीवांनीं तुजपाशीं मागणं हे अगदी अयोग्य होय ! कारण जीवांना हैं सुखं नरकांत देखील शवतुल्य देहानं उपभोगितां येतात ! कमळे, आता यापुढे ध्रुवबाळ देवाला म्हणतो, या निवृतिस्तनुभृतां तव पादपद्म ध्यानाद्वज्जनकथाश्रवणेन वा स्यात् । सा ब्रह्मणि स्वमहिमन्यपि नाथ माभू त्किन्वंतकासिलुलितात्पततां विमानात् ॥ १ ॥ हे विश्वनाथा ! तुझ्या पादपद्माचं ध्यान केलं असतां, किंवा तुझ्या भक्तांच्या कथा श्रवण केल्या असतां, प्राप्त होणारं सुख, हैं प्रत्यक्ष निजानंद ब्रम्हाच्या ठिकाणी सुद्धा नाहीं ! मग स्वर्गात जाऊन पुण्यांश संपल्यानंतर पुन्हा जन्ममृत्यूच्या फे-यांत सांपडणा-या जीवांना ते मिळणं अशक्य होय, हे सांगणं नकोच ! बाई कमळे, यासाठीं ध्रुवबाळ ह्मणते, भक्तिं मुहुः प्रवहतां त्वयि मे प्रसंगो भूयादीत महतामसलाशयानाम् । येनजसोल्त्रणमुरुव्यसने भवाब्धि नेष्ये भवद्गुणकथामृतपानमत्तः ॥ २ ॥ | हे अनंता ! तुझ्या ठिकाणी अखंड भक्ति करणा-या शुद्धचित्त सत्पुरुषांच्या संगतीची मला नेहमी जोड दे. म्हणजे अशा सत्समागमाच्या योगानं मला तुझे गुणकथामृत प्राशन करण्यास मिळेल ! नी त्यामुळे अनेक दुःखांनी भरलेल्या ह्या भयंकर भव सागरांतून मी सहज तरून जाईन ! तेन स्मरंत्याततरां प्रियमीश मयं ये चान्वदः सुतसुहृद्गृहवित्तदाराः ।
पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/123
Appearance