Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. मीकोणहेवोळखावें ॥ आपणआपणापहावें ।। १॥ स्वरूप समरसावेंरात्रंदिवस ॥ धृ० ॥ त्रिगुणावरुतेंज्ञानपैंनिश्चित ॥ तयापेंनिरुते घेईबापा ॥ २ ॥ मुक्ताबाईह्मणेहोईतूंसावध ॥ सांगीतल्याबोधपुढीलतो ॥ ३ ॥ | चांगदेव- मातोश्री, आपला बोध माझ्या हृदयांत पूर्णपणे ठसला ! आणि त्यामुळे चराचरी मला विश्वंभर दिवं लागून, मी त्या विश्वंभरस्वरूपी समरस होऊन गेलों ! वळेनावर सेवरवरपूरआला ॥ तेथेजनबुडालाबाईयानो ॥ १ ॥ बुडालाबुडालापरीह्मणती ॥ बुडाल्याचीशुद्धि कोणीनचेती ॥ २ ॥ ऐलबुडालापैलबुडाला ॥ कोर याचडोहीजनबुडाला ॥ ३॥ ज्ञानदेवसांगडीमुक्ताबाईतारूं ॥ चांगांपैलपारूपावाविला ॥ ४ ॥ मलाबाई- चांगदेवा, हा बोध तुमचे अंतरी पूर्णपणे ठसला असल्यामुळे, चौदाशे वर्षे जतन करून ठेवलेल्या तुमच्या देहाचे सार्थक होऊन त्यास अमरत्व प्राप्त झालें ! आतां शेवटीं तुह्मांला माझे इतकेच सांगणे आहे की, तुम्ही हा देह सांडून त्वरित दसरा जन्म घ्या, आणि मग श्रीपांडुरंगाची उपासना धरून सप्रेम चित्ताने त्याचे अर्चन करा ! श्रीपांडुरंगाच्या भक्तीशिवाय तुम च्या आंगीं सात्विकगुणांची प्रवृत्ति होणार नाहीं ! तुह्मी श्रीपांडुरंगाच्या भेटीला पंढरपुरी जाऊन अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने तेथे कीर्तन करा, ह्मणजे तुह्मी आपल्या ठायीं अपार पुण्य बांधून जीवन्मुक्त व्हाल !, श्रीहरिकीर्तनावांचून मोक्षधाम प्राप्त करून देणारे सोपे साधन या कलियुगांत दुसरे कोणतेच नाहीं ! चांगदेवा, नामबळेदेहीआसोनिमुक्त ॥ शांतिक्षमाचित्तहरिभजने ॥ १ ॥ द्याधराचित्तींसर्वभूतींकरुणा ॥ निरंतरवासना हरिरूपीं ॥ ध्रु० ॥ माधवमुकुंदहरिनामचित्तीं ॥ सर्वपैं। मुक्तिनामा ॥ २ ॥ मुक्ताईचेधनहारिनामेंउच्चारुअवघाचिसंसारूमुक्त केला ॥ ३॥ ( पडदा पडतो. )