पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे, माधव लक्ष्मण न्यायपालिका खंड यांची नियुक्ती झाली. ११जानेवारी१९७९ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १एप्रिल१९९५ रोजी न्या.पेंडसे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २८जुलै१९९५ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. २५मार्च१९९६ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तल्लख बुद्धिमत्ता आणि खटल्यांचे निकाल त्वरित देऊन चोख न्यायदान करण्याची हातोटी याबद्दल न्या.पेंडसेंचा लौकिक होता. - शरच्चंद्र पानसे

शिल्पकार चरित्रकोश