पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड घारपुरे, जनार्दन रघुनाथ । घ । छ । घारपुरे, जनार्दन रघुनाथ ज्येष्ठ वकील आणि संस्कृत विद्वान २४ जून १८७२ - १८ जून १९६२ ऋ मुख्य नोंद - शिक्षण खंड प्राचार्य जनार्दन रघुनाथ ऊर्फ नानासाहेब घारपुरे यांचा जन्म नागपूरला झाला. त्यांचे शालेय शिक्षण इंदौर येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे, बडोदा व मुंबई येथे झाले. १८९५मध्ये बी.ए. व १९००मध्ये एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यावर १९०१ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. दरम्यान काही काळ त्यांनी मुंबईच्या मराठा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक (सुपरिंटेंडंट) म्हणून काम केले. १९०३मध्ये त्यांनी मुंबईस ‘न्यू लॉ क्लास’ सुरू केला व तो काही वर्षे चालविला. याच सुमारास त्यांचा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाशी संबंध आला आणि तो दीर्घकाळ टिकला. प्रा.घारपुरे संस्कृत विद्वान होते आणि धर्मशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास व व्यासंग होता. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात समाजात धर्मशास्त्राचे जे स्थान होते, त्याची जागा आधुनिक काळात कायदा या संकल्पनेने आणि कायद्याच्या व्यवस्थेने घेतली आहे. इंग्रजी राज्यात भारतात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर त्यानुसार जी न्यायालये स्थापन झाली, त्यांच्यासमोर येणार्‍या वैयक्तिक किंवा कौटुंबिक तंट्यांचा निवाडा करण्यासाठी प्राचीन धर्मशास्त्राचे ज्ञान आवश्यक ठरू लागले. ही गरज लक्षात घेऊन प्रा. घारपुरे यांनी १९०९मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी धर्मशास्त्रग्रंथमाला किंवा ‘कलेक्शन ऑफ हिंदू लॉ टेक्स्ट्’ या ग्रंथमालेचे प्रकाशन सुरू केले, ते १९५२-५३पर्यंत म्हणजे ४० वर्षांहून अधिक काळ सुरू होते. या मालेत एकूण चाळीसपेक्षा जास्त खंड प्रसिद्ध झाले. यात धर्मशास्त्रावरील बहुतेक सर्व महत्त्वाच्या प्राचीन ग्रंथांची मूळ संहिता आणि त्यांचे इंग्रजी भाषांतर यांचा समावेश होता. यामधील याज्ञवल्क्यस्मृती आणि तिच्यावरील विश्वेश्वरभट्टाची सुबोधिनी व बाळंभट्टाची लक्ष्मीदेवी या टीका, देवण्णभट्टाची स्मृतिचंद्रिका, नीळकंठभट्टाचा द्वादशमयूख, वीरमित्रोदय, हे ग्रंथ प्रमुख म्हणता येतील. हे संपूर्ण प्रकाशन घारपुरे यांनी स्वत: केले, हे पाहिल्यावर आज थक्क व्हायला होते. याशिवाय प्रा.घारपुरे यांनी इंग्रजी पुस्तकेही लिहिली. त्यांतील एक रोमन कायद्याची तत्त्वेे व हिंदू कायदा आणि कायद्याच्या इतर प्रणालींची तत्त्वे यांचे तुलनात्मक विश्‍लेषण करणारे पुस्तक आणि ‘हिंदू लॉ’ हे स्वतंत्र पुस्तक, त्याशिवाय ‘लॉ ऑफ सापिंड्य रिलेशनशिप’, ‘राइटस् ऑफ विमेन अंडर हिंदू लॉ’, ‘टीचिंग ऑफ धर्मशास्त्र’ ही महत्त्वाची पुस्तके होत. वर उल्लेखिलेल्या ग्रंथमालेच्या एकोणतिसाव्या खंडात त्यांनी एकूण धर्मशास्त्राचा विस्तृत आढावा घेतला आहे. या खंडाचे शीर्षकच ‘ए जनरल इन्ट्रोडक्शन विथ स्पेशल रेफरन्स टू द याज्ञवल्क्य स्मृती अ‍ॅन्ड द मिताक्षर’ असे आहे. या खंडाच्या प्रस्तावनेत त्यांनी ‘धर्म’, ‘शास्त्र’ आणि ‘धर्मशास्त्र’ या संज्ञांचे किंवा संकल्पनांचे अतिशय अभिनव, मार्मिक शिल्पकार चरित्रकोश ४९