पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड लाखकर, श्रीनिवास वामनराव करण्यासाठी त्यांनी एका नवीन संस्थेची उभारणी केली. अशा आस्थापनांच्या रक्षणासाठी त्यांनी मांडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार नंतर नौसेनेकडून करण्यात आला. ‘ऑफशोअर डिफेन्स अ‍ॅडव्हायजरी ग्रुप’चे ते पहिले ध्वजाधिकारी (फ्लॅग ऑफिसर) होते. त्याबरोबर ‘मॅरिटाइम स्टेट ऑफ महाराष्ट्रा’चे पहिले ‘ध्वजाधिकारी’ म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात, जानेवारी १९९०पासून त्यांनी तटरक्षक दलाचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या ह्या कार्यकाळात तटरक्षक दलाला खर्‍या अर्थाने लौकिक प्राप्त झाला. भारतीय नौसेनेतील उत्कृष्ट पाणबुडे (डायव्हिंग ऑफिसर), तसेच विमानवाहू नौका व नाविक विद्येचे तज्ज्ञ हीच त्यांची ओळख आहे. ते उत्तम गोल्फपटूसुद्धा आहेत. नौसेनेतील देदीप्यमान कारकिर्दीबद्दल ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने २६ जानेवारी १९६२ रोजी त्यांचा गौरव करण्यात आला. - प्रणव पवार

  • * *

शिल्पकार चरित्रकोश ४८३