पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड तारापोर, अर्देशिर बुरसारजी ठिकाणांशी असलेला संपर्क तोडण्याचे पहिल्या कोअरच्या जनरल ऑफिसर कमांडिंगतर्फे ठरवण्यात आले. त्याकरिता मग तारापोर यांच्या नेतृत्वाखालील पूना हॉर्स रेजिमेंट आणि आठव्या गढवाल रायफल्स फौजांना जस्सोरा-बुतुर-डोगरांडी या भागात पार रोवायला सांगण्यात आले. त्यांनी हा भाग काबीज केला. ते ज्या रणगाड्यावर होते, त्याच्यावर अनेकदा हल्ला झाला. पण पारदळाला शत्रूवर हल्ला करता यावा यासाठी त्याच परिस्थितीत रणगाड्यातून ते लढत राहिले आणि इतरांसमोर त्यांनी आदर्श ठेवला. त्या आदर्शाने प्रभावित होऊन पूना हॉर्स रेजिमेंटने जोमाने लढाई केली. या लढाईत शत्रूचे साठ रणगाडे नष्ट झाले, तर भारताचे केवळ नऊ रणगाडे नष्ट झाले. मात्र, तारापोर यांच्यासारखा धीरोदात्त जवान भारताला गमवावा लागला. सातत्याने सहा दिवस शर्थीचा लढा देत अद्वितीय कामगिरी करणार्‍या तारापोर यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल मरणोत्तर ‘परमवीरचक्र’ देऊन गौरवण्यात आले. - पल्लवी गाडगीळ

  • * *

शिल्पकार चरित्रकोश ४४५