पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण -शिल्पकार चरित्रकोश या प्रकल्पातील कोशमालिकेतील हे चवथे पुष्प आहे. या खंडाला जोडून प्रशासन व न्यायपालिका हे दोन खंडही प्रकाशित होत आहेत. संरक्षण खंडासाठीची पहिली बैठक ले, शेकटकर व साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांच्या उपस्थितीत मार्च मध्ये झाली. या वेळी खंडाच्या रचनेसंदर्भात काही निकष ठरवण्यात आले. त्यावेळी चर्चेतून असे लक्षात आले की, साधारणपणे गेल्या दोनशे वर्षात संरक्षण क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या सर्व शुरवीरांचा समावेश या खंडात करणे जागेअभावी केवळ अशक्य आहे त्यामुळे निकष तयार करणे व त्यानुसार खंड पूर्ण करणे गरजेचे होते. ज्यांनी संरक्षण क्षेत्रात विविध आघाड्यांवर अभिमानास्पद कामगिरी बजावली आणि त्यासाठी त्यांना शौर्यपदके बहाल करण्यात आली. तसेच या क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर काम केले अशाही व्यक्तींचा उल्लेख या खंडात येणे आवश्यक होते. । यानंतरचा पुढचा महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे विविध शौर्यपदक मिळालेल्या व्यक्तींच्या नावांची यादी तयार करणे महत्वाचा स्त्रोत ठरला तो म्हणजे पुण्यातील राज्य सैनिक बोर्ड. याद्या बनवण्यासाठी राज्य सैनिक बोर्ड आणि संरक्षण क्षेत्राशी संबधित संकेतस्थळे हे दोन महत्वाचे स्त्रोत ठरले. याद्या अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी भूसेना, नौसेना व वायुसेना यांच्या मुख्यालयांशी संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांच्याकडून फारशी मदत मिळू शकली नाही. | दि. २१ नोव्हेंबर २००९ रोजी संरक्षण खंडाच्या सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी एअर मार्शल भूषण गोखले, रिटायर्ड नेव्हल ऑफिसर विनायक अभ्यंकर, अविनाश पंडीत, पत्रकार प्रसाद कुलकर्णी, प्रकल्प समन्वयक महेश पोहनेरकर ही मंडळी उपस्थित होती. या बैठकीमध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या याद्या तपासण्यात आल्या व काही नवीन नावेही उपस्थितांच्या सुचनेनुसार समाविष्ट करण्यात आली. तसेच एकूण खंडाचे स्वरूप व आराखडा याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील व या क्षेत्राशी संबधित मान्यवर व्यक्तींबरोबरच या क्षेत्राशी संबधित महाराष्ट्रातील संस्थाची किमान माहिती समाविष्ट करावी असे ठरवण्यात आले. खंडातील श्रेणीविभाजन, शब्दसंख्या निश्चिती यांबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाली. | भूसेना, वायुसेना तसेच नौसेना या तिन्ही सेनांमध्ये व्हिक्टोरिया क्रॉस या लष्करी सन्मानप्राप्त वीरांपासून ते इतर शौर्यपदके व सेवापदके मिळवणाच्या वीरांचा समावेश यादीमध्ये आहे, तसेच संरक्षण क्षेत्रामध्ये विविध उच्चपदांवर नेतृत्व गाजवलेल्या मराठी अधिका-यांचा समावेश यादीत आहे. मात्र या सगळ्यापर्यंत पोचणे व त्यांची महिती मिळवणे तेवढे सोपे नव्हते. यातील काही वीरांना मरणोत्तर शौर्यपदक मिळाल्याने त्यांच्याबाबत खुप तपशील उपल्ब्ध झाले नाहीत परंतु अशा नावांचे किमान तपशील व फोटो मिळवणे एस एस गांधी यांनी संपादित केलेल्या ऑफ व्हेलॉर या पुस्तकामुळे अतिशय सुकर झाले. सध्या निवृत्त असणा-या अथवा सेवेत असणा-या जास्तीत जास्त वीरांना प्रत्यक्ष भेटून महिती घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही व उपलब्ध लेखकांनी केला. शिल्पकार चरित्रकोश ३८५