पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाम, भीष्मराज पुरुषोत्तम प्रशासन खंड काळात मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी त्यांनी पोलीस दलामार्फत केली. पोलीस सेवेत असताना त्यांना ‘इंडियन पोलीस मेडल’, ‘प्रेसिडेन्स पोलीस मेडल फॉर डिस्टिन्ग्विश्ड सर्व्हिस’ ही पदके देण्यात आली. भारतीय पोलीस सेवेतल्या काही ठराविक लोकांना कोलंबो शिष्यवृत्ती दिली जाते, ती श्रीकांत बापट यांना मिळाली. पोलीस प्रशासनातले अत्युच्च शिक्षण घेण्याची संधी त्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळाली. त्यासाठी ते ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये गेले होते. भारतीय गुप्तचर विभागात काम करताना पाश्चिमात्य देशांमधल्या गुप्तचर संघटनेत विचारांचे आदानप्रदान करण्याची संधीही त्यांना मिळाली. आज पोलीस सेवेतून ते सेवानिवृत्त झाले आहेत. पण त्यांना पुन्हा संधी मिळाल्यास ते पोलीस सेवेतच येतील इतकी त्यांची या कामावर श्रद्धा आहे. त्यामुळेच सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये १९९३ ते १९९९ या काळात ज्येष्ठ सदस्य पदावर जेव्हा कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रशासकीय सेवेसाठी योग्य व्यक्तींची निवड केली. त्यानंतर त्यांनी आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या ‘हिंदुजा फाउण्डेशन’चे अध्यक्ष म्हणून ७ वर्षे काम केले. राजस्थान इथल्या युनायटेड रिसर्च डेव्हलपमेंट प्रोग्राम या सामाजिक संस्थेचेही ते विश्वस्त आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय समितीसमोर कुलगुरूंचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. आज खाजगी क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांच्या संचालक मंडळावरही ते आहेत. इथे मनुष्यबळ विकासाचे काम ते करतात. राष्ट्रीय सुरक्षा, मनुष्यबळ विकास, फळशेती अशा विषयांत रस असल्याने ते आज या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. - पल्लवी गाडगीळ बाम, भीष्मराज पुरुषोत्तम सहसंचालक-महाराष्ट्रराज्यगुप्तवार्ताविभाग, पोलीसमहासंचालक-मध्यप्रदेश, क्रीडाप्रशिक्षकवमानसशास्त्रज्ञ १ ऑक्टोबर १९३८ भीष्मराज पुरुषोत्तम बाम यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून गणित विषय घेऊन प्रथम क्रमांकासह पदवी प्राप्त केली. ‘खेळ’ हा लहानपणापासून त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हैद्राबादेतील ‘हनुमान व्यायाम मंडळा’त बालपणापासून जाऊन व्यायाम, पोहणे, जिम्नॅस्टिक्स व बॉक्सिंग या खेळांमध्ये शालेय-महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय स्तरावरचे यश व पुढे पोलीस पदाधिकारी असतानाही नेमबाजी, बिलियर्डस्, स्नूकर यांत मिळवलेले कौशल्य यांतून बाम यांचे अस्सल क्रीडाप्रेम दिसून येते. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धाही गाजवल्या.

१९६३-१९६४ मध्ये त्यांनी पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला यवतमाळ, वर्धा व बामगाव येथे त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले. मुंबई रेल्वे विभागातही त्यांनी पुन्हा यवतमाळसह नाशिक येथे काम केले. मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून चांगली कामगिरी केली. १९८२मध्ये भारतीय गुप्तहेर खात्यात निवड झाल्यानंतर त्यांनी ‘परदेशी गुप्तहेरांच्या कारवायांवर नियंत्रण’ या विषयावर प्रभुत्व मिळवले. परिणामी दिल्ली येथे त्यांची उपनिरीक्षक म्हणून महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली. पुढे परदेशी गुप्तहेरांच्या कारवाया रोखण्यासाठी त्यांना मुंबई येथे खास पदी नेमण्यात आले. मध्य प्रदेशात बढतीसह पोलीस महासंचालक पद (१९९०) आणि नंतर गुप्तवार्ता विभागात महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यात सहसंचालक पद या पदांची जबाबदारी त्यांनी 

२९८ शिल्पकार चरित्रकोश ब |