पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड जोशी, श्रीधर दत्तात्रय अंघोळीनंतर जमा होणार्‍या सांडपाण्यावर ६०-७० फळझाडांची एक बाग उभारण्यात आली आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अशा प्रकारची जलव्यवस्थापनाची कामे करण्याचा जोग यांचा मानस आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा तालुका संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणची संत्र्यांची झाडे पाण्याच्या अभावामुळे वाळली होती. जोग यांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून येथील पाच नाल्यांवर ‘चेक डॅम’ बांधून मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे. आज वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीदेखील जोग या सामाजिक कामांमध्ये तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने भाग घेतात. यांनी आपली साधी राहणी व सामाजिक कामातून निवृत्तीनंतरच्या समाजसमर्पित जीवनाचा एक वस्तुपाठच घालून दिला आहे. सूर्यकांत जोग यांच्या दोनही मुलांचा मृत्यू दुर्दैवाने त्यांच्या तरुण वयात झाला. त्यांचा मोठा मुलगा दीपक जोग मुंबई येथे उपायुक्त, गुन्हे अन्वषण शाखेत या पदावर असतानाच मृत्युमुखी पडला दुसरे पुत्र तर दुसरा मुलगा भारतीय वायुसेनेत फायटर पायलट या पदावर असताना, विमान अपघातात मृत्युमुखी पडला. आपल्या दोन्ही मुलांच्या स्मरणार्थ जोग यांनी दोघांच्याही नावाने ट्रस्ट निर्माण केले आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्त्या देण्यात येतात. तसेच मयत पोलिसांच्या दहा मुलांना दरवर्षी त्यांच्या फी आणि पुस्तकांकरिता मदत देण्यात येते. या दोन्ही ट्रस्टमधून दरवर्षी १५,००० रुपये खर्च करण्यात येतात. हा उपक्रम गेली वीस वर्षे अव्याहत चालू आहे. जोग यांची कन्या अंजली बॅनर्जी या अर्थशास्त्र आणि गणित या विषयात एम.ए.एम.एड. असून सध्या त्या पुणे येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नोकरी करत आहेत, तर त्यांचे जावई अजय बॅनर्जी हे आर्मी ब्रिगेडियर या पदावर कार्यरत आहेत. - संध्या लिमये जोशी, श्रीधर दत्तात्रय भारतीय प्रशासकीय सेवा उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण सचिव, अन्न व नागरी पुरवठा, महाराष्ट्र राज्य २५ ऑगस्ट १९४१ श्रीधर दत्तात्रय जोशी यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रय दिनकर जोशी हे मध्य रेल्वेत सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर होते. त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई श्रीधर जोशी यांचे प्राथमिक शिक्षण मनमाड येथील नगरपालिकेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण मध्य रेल्वे माध्यमिक शाळेतून झाले. जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र व संख्याशास्त्र घेऊन बी.ए. (ऑनर्स) ही पदवी मिळवली. १९६२ मध्ये महालेखापाल, मुंबई यांच्या कार्यालयात श्रीधर जोशी कमर्शिअल ऑडिटर या पदावर रुजू झाले. या पदावर असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, महाराष्ट्र राज्य वाहतूक मंडळ, आकाशवाणी, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वगैरे केंद्र व राज्यशासनाच्या संस्थांचे लेखापरिक्षण केले, त्यामुळे त्यांना शासनाची मूलभूत माहिती मिळाली. याचा उपयोग त्यांना पुढे प्रशासनातील विविध पदांवर काम करताना झाला. १९६४ मध्ये श्रीधर जोशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांची निवड उपजिल्हाधिकारी या पदावर झाली. पहिली नेमणूक ठाणे येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी या पदावर झाली. तेथे ते जून १९६५ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे प्रभारी तहसीलदार म्हणून चार महिने काम केले. नंतर १९६७ मध्ये त्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे शिल्पकार चरित्रकोश २४७