पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज प्रशासन खंड जोग, सूर्यकांत शंकर वनविभाग या पदावर करण्यात आली. हे पद भारतीय वनविभागातील दुसर्‍या क्रमांकाचे पद मानले जाते. वनसंवर्धनावर त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळेच ‘नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्डा’च्या सचिव पदाची जबाबदारीही या वेळी त्यांच्यावर देण्यात आली. जाधव यांच्या केंद्र सरकारमधील या दोन वर्षांच्या कार्यकालात निर्वनीकरणाचा दर शून्यावर आला होता. वनसंवर्धनासाठीच्या प्रयत्नांची सुरुवात सरकारपासून व्हावी म्हणून सरकारी कार्यालयामध्ये लाकडाचे पॅनलिंग, लाकडी फर्निचर होऊ नये असा आदेश त्यांनी काढला. रेल्वेच्या रूळपट्ट्या तयार करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रतीच्या झाडांची तोडणी केली जाते. लाकडी रूळपट्ट्यांना पर्याय म्हणून त्यापेक्षा चांगले, कमी किमतीचे आणि दीर्घकाळ टिकाऊ असे काँक्रीटच्या रूळपट्ट्या वापरावेत असे त्यांनी रेल्वे मंत्रालयाला सुचविले. याला नकार मिळाल्यावर जाधव यांनी वनविभागाकडून रेल्वे मंत्रालयाला रूळपट्ट्या विकल्या जाणार्‍या लाकडाच्या किंमती ७० टक्क्यांनी वाढवून सांगितल्या. शेवटी ते प्रकरण तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे गेल्यावर जाधव यांनी त्यांना ही बाब पटवून दिली आणि लाकडाच्या रूळपट्ट्या वापरणे बंद झाले. जाधव यांनी स्थानिक जनतेचा वन-व्यवस्थापनामध्ये सहभाग असावा व वनसंवर्धन म्हणजे केवळ सरकारची जबाबदारी न राहता ती लोकांना स्वत:ची जबाबदारी वाटावी म्हणून वनविस्तार (फॉरेस्ट एक्स्टेंशन) योजना सुरू केली. अर्थसंकल्पामध्ये वनीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. १९८८ मध्ये जाधव के्ंरद्र सरकारच्या वनविभाग इन्स्पेक्टर जनरल या पदावरून निवृत्त झाले. सध्या ते पुणे, अमरावती येथे स्थायिक झाले आहेत. निवृत्तीनंतर ते वनसंवर्धन कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय पडित जमीन विकास महामंडळाचे सचिव म्हणून कार्यरत असताना जाधव यांच्या सूचनेवरून पंतप्रधान राजीव गांधी यांनी सामाजिक वनीकरणामध्ये महत्त्वाची कामगिरी करणार्‍या व्यक्तीसाठी इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार सुरू केला. - संध्या लिमये

जोग, सूर्यकांत शंकर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य २५ जुलै १९२९ सूर्यकांत शंकर जोग यांचा जन्म अमरावती येथे झाला. वडील शंकर जोग हे १९२९ ते १९३५ या काळात सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सभासद होते. देशाच्या संरक्षण व प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची परंपरा जोग घराण्यात आहे. त्यांचे मामा परांजपे हे मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त होते. जोग यांच्या आठ भावांपैकी दोन भाऊ भूसेनेतून कर्नल या पदावरून निवृत्त झाले आहेत, तर दोन भावांनी भारतीय वायुसेनेतून देशसेवा केली आहे. सूर्यकांत जोग यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्तीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात एन.सी.सी.मध्ये अंडर ऑफिसर आणि त्यानंतर अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. एन.सी.सी.मधील या जबाबदारीतूनच पुढील काळात भारतीय पोलीस सेवेत (आय. पी. एस.) मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याच काळात क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. त्या काळातील चार परदेशी संघांविरुद्ध असणार्‍या कर्नल सी.के. नायडू यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघात त्यांची निवड झाली होती. तसेच रणजी ट्रॉफी आणि फुटबॉल संघातही त्यांची निवड झाली होती.

शिल्पकार चरित्रकोश २४५