पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ग प्रशासन खंड गोखले, केतन कमलाकर अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असत. याच काळात ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे अभ्यासक्रम संचालकही होते. मे १९८६ ते जून १९९१ या कालावधीत केतन गोखले सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम्स येथे मुख्य प्रशिक्षण व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. रेल्वेमधील अधिकार्‍यांना माहिती तंत्रज्ञान या विषयाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी गोखले यांच्यावर होती. जून १९९१ ते जून १९९६ या काळात गोखले मुख्य व्यवस्थापक (दळणवळण) या पदावर कार्यरत होते. भारतीय रेल्वे यंत्रणेसाठीचे प्रवासी सेवा व्यवस्थापन (लिंक मॅनेजमेंट, क्रू मॅनेजमेंट) करण्याची जबाबदारी गोखलेंवर होती. जून १९९६ ते ऑक्टोबर ९७ या कालावधीत गोखले यांनी चीफ ऑपरेशन मॅनेजर या पदावर मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पासाठी काम केले. १९९७ ते २००० या कालावधीत गोखले यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक या पदावर आग्नेय रेल्वे विभागात ओरिसा येथे काम केले. या विभागातील मनुष्यबळ विकास, कर्मचारी संघटना, मार्केटिंग सर्व्हिस अशा सर्वच विभागाच्या व्यवस्थापनाचे काम केले. १९९९मध्ये ओरिसामध्ये झालेल्या चक्रीवादळात गोखले यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य केले. गोखले यांनी अवलंबलेल्या आराखड्याचे (मॉडेल) सर्वत्र कौतुक करण्यात आले. तसेच रेल्वे स्टाफ कॉलेजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यात आला. मे २००० ते जानेवारी २००५ या कालावधीत गोखले यांची नियुक्ती कोकण रेल्वे महामंडळाच्या संचालक पदावर करण्यात आली. त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, नवीन संकल्पना अमलात आणल्या आणि कोकण रेल्वेला नफ्यात आणले. गोखले यांनी ‘रोल ऑन रोल ऑफ’ सुविधा या योजनेचे काम हाती घेण्याअगोदर ही योजना पंच्याहत्तर लाख रुपये तोट्यात होती. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोलाड ते मंगलोर या मार्गावरून होणारी ट्रक वाहतूक रेल्वेच्या वॅगन्समधून करण्यात येऊ लागली. यामुळे मालवाहतूक सुलभ झाली व ट्रेनच्या एका फेरीत देशाचे तीन ते पाच लाख लिटर डिझेल वाचले. या योजनेचे यशस्वी नियोजन केल्यामुळे आता कोकण रेल्वेमार्गावर अशा पाच ट्रेन धावत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. कोकण रेल्वेमध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी गोखले यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व स्थानकांवरील ठेल्यांचे (स्टॉल्स) ठेके स्थानिकांना, विशेषत: महिला बचतगटांना देण्यात आली. रेल्वेमध्ये हापूस आंब्याच्या विक्रीसाठी स्थानिकांना परवाने देण्यात आले. रेल्वेच्या खानपान सेवेमध्ये स्थानिक पदार्थांचा समावेश करण्यात आला. गोखले यांनी कोकण रेल्वेच्या खानपान सुविधेचे आधुनिक पद्धतीने नियोजन केले. प्रवाशांना प्रथमच छापील ‘मेनू कार्ड’ देण्यात येऊ लागले. खानपान सेवेचे तीन वर्षांसाठी ठेके देण्यात आले. त्यामुळे खानपान ठेकेदारांना कार्यक्षम सेवा देण्याची संधी देण्यात आली. या सुविधांबाबत गोखले स्वत: प्रवाशांशी संवाद साधत असत. कोकण रेल्वेमधील स्वच्छता व्यवस्थेचे श्रेयही गोखले यांनी आखलेल्या योजनेलाच आहे. त्यासाठी त्यांनी चालू गाडीत सफाई शिल्पकार चरित्रकोश २१९