पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| | प्रशासन खंड कामटे, अशोक मारुतीराव गळकी घरे, नहाणी घर व इतर दुरावस्था कानेटकरांमार्फत सरकारच्या (प्रशासनाच्या) नजरेसमोर आणण्याचा त्या प्रयत्न करीत. पोलिसांच्या बायकांना सक्षम करण्यासाठी त्यांना शिवणाचे प्रशिक्षण, शिवणाची यंत्रे देणे असे उपक्रम सुरू करून त्याचा पाठपुरावा त्यांनी केला. कानेटकरांची शेवटची नियुक्ती दिल्लीला झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक व याच दलाचे ते पहिले महासंचालक झाले. कानेटकरांनी सैन्याप्रमाणेच या दलाच्या बटालिअन्स तयार केल्या. हे दल भारतीय सैन्याच्या तोडीस तोड करण्याचा मान कानेटकरांकडेच जातो. पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य त्यांच्या कौटुंबिक स्थैर्यावर अवलंबून असते याची जाणीव कानेटकरांना होती. त्यामुळेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ त्यांनी पोलिसांच्या कुटुंबांची निवासव्यवस्था केली. पुणे जिल्ह्यात पवना धरणाजवळ हे केंद्र उभारले आहे. या परिसरात पोलिसांसाठी निवासस्थाने आणि शाळाही उभारल्या आहेत. ‘टेल्स ऑफ क्राइम’ आणि ‘क्राइम इन द फ्यूचर’ या दोन पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. कानेटकर सेवानिवृत्त झाल्यावर जवळजवळ वीस वर्षांनी ‘लोकसत्ते’त मुंबईबद्दल अग्रलेख आला होता. त्यात शेवटची ओळ होती, ‘कानेटकर व पिंपुटकरांसारखे अधिकारी लाभल्याशिवाय मुंबई शहराला भवितव्य नाही.’ - अशोक कानेटकर

कामटे, अशोक मारुतीराव अतिरिक्त पोलीस आयुक्त-मुंबई २३ फेब्रुवारी १९६५ - २६ नोव्हेंबर २००८ २६नोव्हेंबर२००८ हा मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. संपूर्ण देशाला हादरा देणारा असा दहशतवादी हल्ला होता तो. या हल्ल्याचा प्रतिकार करताना देशाने अनेक लढवय्ये योद्धे गमावले. त्यांतीलच एक अशोक मारुतीराव कामटे होते. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातले हे कुटुंंब. आजोबा गणपतराव कामटे यांनी मुंबई प्रांताचे पहिले भारतीय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून काम केले. वडील मारुतीराव कामटे भारतीय सैन्यात होते. अशा पिढ्यान्पिढ्या देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या कुटुंबात अशोक कामटे यांचा जन्म झाला. राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयातून १९७२-१९७७ या कालावधीत त्यांनी शिक्षण घेतले. १९८२ मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. १९८५ मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथून त्यांनी पदवी मिळवली, तर दिल्ली येथील सेंट स्टिफन्स महाविद्यालयामधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८७मध्ये पेरू येथे झालेल्या कनिष्ठ पॉवर लिफ्टिंगमध्ये मध्ये अशोक कामटे यांनी भारताचे नेतृत्व केले होते. अशोक कामटे हे १९८९ सालच्या भारतीय पोलीस सेवेच्या महाराष्ट्र तुकडीतील अधिकारी होते. त्यांनी देशात अनेक ठिकाणी काम केले. सन १९९१ मध्ये भंडारा जिल्ह्यात त्यांची साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. १९९४ ते २००८ या त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांत, पोलीस अधीक्षक, यूएन मिशन ऑफिसर, पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त अशा पदांवर काम केले. जून २००८ मध्ये त्यांची नियुक्ती अतिरिक्त म्हणून मुंबईतील पूर्व महामंडळावर झाली होती. सांगली जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर थोड्याच कालावधीत कुख्यात गुंड राजू पुजारी पोलीस चकमकीत मारला गेला. धाडसी, करारी व्यक्तिमत्त्वाचे कामटे शांत स्वभावाचे होते. म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतसुद्धा ते शांतपणे आपले डावपेच तयार शिल्पकार चरित्रकोश १८७