पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड गुजरातमध्ये अरनेज व कर्नाटकमध्ये विजापूर, बैलहोंगल आणि अन्नेगिरी येथे स्थानिक वाणांवर काम सुरू झाले. त्यातून 'A - 206' (ढोला काथा) व 'A-624' (राता काथा) हे स्थानिक जातींसारखे जिरायती वाण अरनेज येथे विकसित केले गेले. पुढे तेही वाण करपा रोगाला बळी पडत असल्यामुळे त्यांचा 'गाझा' या कॅनेडियन जातीशी संकर करून तांबेरा व करपा प्रतिकारक वाण विकसित केले गेले. सन १९५४ मध्ये डॉ. गो. ब. देवडीकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी, पुणे येथे गव्हाच्या आंतरप्रजातीय संकराचा प्रकल्प भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या आर्थिक साहाय्याने सुरू झाला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असा होता की, आंतरप्रजातीय संकर करून गव्हाच्या गुणसूत्रांचे विश्लेषण करणे आणि काही रानटी गव्हाच्या जातींमधून उपयोगी असे गुणधर्म बन्सी आणि खपली गव्हात स्थानांतरित करणे. यासाठी 'टि. ह्रकार्थलिकम', 'पोलोनिकम', 'डायकोक्कायडीस', 'टिमोफीव्ही', 'पिरॅमिडल' इत्यादी रानटी जातींचा 'बन्सी' आणि 'खपली गव्हाशी संकर केला गेला. त्यातून १९७०च्या दशकात 'एम. ए. सी. एस. ९' हा जिरायती वाण विकसित झाला. या काळात प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकरी १६०० ते २२०० कि.ग्रॅ. इतके उत्पन्न काढले होते, जे या भागातील सरासरीच्या ३ ते ४ पट होते. मका : एकूण ५,५०,००० एकर क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात येत असे व त्यातून दोन लाख टन (३६३ कि. ग्रॅ. एकरी) उत्पन्न मिळत असे. मक्याची लागवड पंचमहाल, साबरकांठा, बडोदा व बेळगाव जिल्ह्यांत मुख्यतः होत असे. दोहाड (पंचमहाल) आणि अरभावी (बेळगाव) येथे राबवण्यात येणाऱ्या मका सुधार कार्यक्रमात स्थानिक 'सामेरी' जातीतून निवड पद्धतीने नवीन जाती शोधण्यात आल्या, ज्यांची उत्पादनक्षमता स्थानिक जातींपेक्षा १०-१५% जास्त होती. (उत्पन्नः ५ क्विं./एकर) सन १९४२-४३ मध्ये तीन जातींचा संकर करून २५% जास्त उत्पन्न दणारे ‘(I,XL,) X S- 23' वाण विकसित केले गेले. यात 'I, व L,' या स्थानिक जाती, तर 'S-23' ही आफ्रिकन सहारा जात होती. १९५५-५६मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे मका सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला, त्यातून अरभावी व दोहाड येथून 'Texas - 26, N. C. - 27' आणि 'Dixie - 18' या संकरित जाती मिळाल्या. शिल्पकार चरित्रकोश ज्वारी : ज्वारी हे मुंबई इलाख्यात कोट्यवधी एकरात लागवडीखाली असलेले पहिल्या क्रमांकाचे पीक. पैकी २/ ३ क्षेत्र हे रब्बी ज्वारीखाली, तर उरलेले १/३ हे खरीप ज्वारीसाठी वापरले जात असे. खरीप ज्वारी सुधाराचे काम १९२१ - २२ह्नमध्ये धारवाड व सुरत येथे, तर रब्बी ज्वारी सुधाराचे काम १९२९ मध्ये मोहोळ येथे आर. के. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. मालदंडीपासून 'M- 35-1' (चि.क्र. ९ ब ) आणि 'M-47-3' या जाती निवडण्यात आल्या, तर नगर दगडीपासून 'दगडी - ३६' ही १०% जास्त उत्पन्न देणारी जात विकसित केली. तसेच त्या वेळी ज्वारीचे पुवंध्य वाणासंबंधी त्यांचे संशोधन सुरू होते, त्यासंबंधीची रेखाचित्रे त्यांच्या फाइलमध्ये प्रस्तुत लेखकाने पाहिली होती. अमेरिका व आफ्रिका येथून आणलेल्या परदेशी ज्वारीच्या जाती भारतात सरळ प्रसारित करण्यास उपयुक्त ठरल्या नाहीत. रंगास्वामी अय्यंगार आणि पोनय्या (१९३७) यांनी केलेल्या अभ्यासात पहिल्यांदा ज्वारीच्या पुवंध्य वाणाची नोंद करण्यात आली. त्याचबरोबर जास्त उत्पन्न देणाऱ्या संकरित वाणनिर्मितीसाठी पुवंध्य वाणाची उपयुक्तता तपासण्याचे काम सुरू झाले. सन १९२८ मध्ये कोट्टूर आणि चव्हाण यांनी कर्नाटकात केलेल्या अभ्यासात व कोल्हे यांनी १९५१ह्नमध्ये खानदेशात केलेल्या अभ्यासात ज्वारीचे उत्पन्न व इतर गुणधर्म यांच्यात सहसंबंध तपासून पाहाण्यात आले. त्यात असे आढळले की, रोपाची उंची, पेरांची संख्या, खोडाचा परिघ, कणसाची जाडी व वजन यांचा ज्वारीच्या उत्पन्नाशी सकारात्मक सहसंबंध आहे. तसेच कणसाखालच्या पेराची लांबी व ज्वारीचे उत्पन्न यांचा नकारात्मक सहसंबंध आहे. या अभ्यासामुळे पीक-पैदासकारांना निवड पद्धतीने वाण निर्माण करणे सोपे झाले. कर्नाटकातील स्थानिक जातींपासून 'नंदयाल', 'पांढरी फुलगार', 'पिवळी फुलगार' आणि 'बिलचीगन' या जातींची उत्पत्ती करण्यात आली. सुरत येथे 'बुधपेरीओ' पासून 'बी. पी. ५३' या १३% जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीची निर्मिती केली गेली व तिची लागवड ५०,००० एकरवर वाढवण्यात आली. ' C-10-2' ही विरमगाव येथे निवडण्यात आलेली जात धान्य व चाऱ्याच्या उत्पन्नात सरस होती व या जातीत प्रथिनांचे २३