पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड कार्यक्रम राबवण्यात डॉ. जाधव यांचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रात व विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस शेतीसाठी पाणी हा फार मर्यादित घटक असल्यामुळे, कारखान्याच्या राजर्षी शाहू ट्रस्टच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम व मोजका वापर याविषयी शेतकऱ्याला प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शनाच्या कामात कार्यरत असतात. जामकर, रावसाहेब बापूसाहेब घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांना एकत्र कुटुंबातील वाटणीतून १२५ एकर जमीन मिळाली होती, पण रावसाहेबांनी शेती व्यवसाय करावा, असे वडिलांना वाटत जाफर एम. वनस्पतिशास्त्रज्ञ २२ फेब्रुवारी १९१३ - ११ ऑगस्ट १९५८ - संपादित जाफर यांनी १९३८ साली उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर आय. ए. आर. आय. नवी दिल्ली येथून असोसिएटशिप (१९४०) आणि विस्कॉनसीन, यू.एस.ए. | येथून पीएच.डी. पदवी (१९४९) मिळवली. १९४७ साली फाय साइन या झिटा, अमेरिका येथील जीवशास्त्रीय संस्थेत सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली. डॉ. जाफर हे भारतीय आनुवंशिकी आणि वनस्पती पैदास संस्थेचे संस्थापक सदस्य होते. परभणी येथील संशोधन केंद्रात अर्थ वनस्पतिशास्त्रज्ञ या पदावर असताना खरीप आणि रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या सुधारित जाती निर्मितीचे काम केले. या संस्थेत त्यांनी १२ वर्षे संशोधन कार्य करून ज्वारीबरोबरच इतर पिकांवरही संशोधन केले व या पिकांसाठी योग्य अशा लागवडीच्या पद्धतीचीही शिफारस केली. जामकर, रावसाहेब बापूसाहेब प्रयोगशील शेतकरी ६ नोव्हेंबर १९३४ नव्हते, त्यामुळे त्यांनी रावसाहेबांना घेण्यासाठी बाहेरगावी ठेवले होते. शिक्षण ज रावसाहेबांनी हैदराबाद विवेकवर्धिनी व अंबाजोगाई योगेश्वरी शिक्षण संस्था येथे शिक्षण घेतले. रावसाहेबांचे शिक्षण संपण्याच्या सुमारास त्यांचे संयुक्त कुटुंब विभक्त झाले होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर रावसाहेबांनी शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली. आपली शेती शास्त्रीय पद्धतीने करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्याचा उपक्रम राबवला. तसेच शेतात शेणखत, कंपोस्ट खत आणि रासायनिक खत यांचा योग्य तो उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना चांगले पीक घेता येऊ लागले. रावसाहेब आपले ज्ञान स्थानिक शेतकऱ्यांना आनंदाने देत असत. त्यामुळे लवकरच ते जांबचे सरपंच झाले. जांबच्या शेतकऱ्यांचा माल जिल्ह्याच्या ठिकाणी योग्य भावाने विकला जावा, म्हणून त्यांनी परभणी येथे आ दुकान स्थापन केले. पुढे १९६२ मध्ये रावसाहेब जिल्हा परिषदेवर निवडून गेले व त्यांनी सात वर्षे जिल्हा परिषदेच्या कृषी सहकार समितीवर काम केले. शेतीला पाण्याची चांगली सोय व्हावी; म्हणून रावसाहेबांनी आपल्या शेतजमिनीवर चौदा विहिरी खोदल्या. - संपादित पूर्वी त्यांची जमीन ठिकठिकाणी विखुरलेली होती. गैरसोयीची ठरणारी जमीन विकून त्यांनी केवळ दोन ठिकाणीच सलग २५० एकरांत जमिनीचा विस्तार केला. पुढच्या काळात संकरित बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्यांनी दर्जेदार शुद्ध बियाण्यांची प्रक्रिया आणि विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी सहयोगी बीज उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन केली. तसेच परभणी रावसाहेब बापूसाहेब जामकर यांचा जन्म परभणी तालुक्यातील जांब या गावी एका पिढीजात श्रीमंत शिल्पकार चरित्रकोश १२३