पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड १९४२ दरम्यान सोलापूर येथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्रावर पायाभूत स्वरूपाच्या जल व मृदा संधारणावर संशोधन केले. प्रथम त्यांनी अवर्षणप्रवण क्षेत्राच्या हवामानाचा सखोल अभ्यास केला व पडलेल्या पावसाचे काळजीपूर्वक निरीक्षण व मापन करून खालीलप्रमाणे आकडे नोंदवले. जमिनीच्या पृष्ठभागावरून अपधाव (Surface Runoff), 0 ते २०%, जमिनीत मुरलेल्या ८० ते ९०% पाण्यापैकी पृष्ठभागावरून बाष्पीभवन ६०%, खोल निचऱ्यावाटे १०%, पिकांसाठी उपलब्ध ५ ते १५%, पिकांसाठी अनुपलब्ध ५%. सोलापूर येथे पडलेल्या (९ वर्षांच्या) सरासरी २४ इंच पावसापैकी अपधाव कुळवणीमुळे ५.४ इंच, रब्बी ज्वारीमुळे ४.५ इंच, बाजरी + तूर पिकामुळे ३.७५ इंच असा नोंदवला गेला. जमिनीवरील तण न काढल्यामुळे १.२ इंच तर स्कूपिंग ( अवजाराने शेतभर उथळ खड्डे) केल्यास २.४ इंच इतका कमी अपधाव होतो. जेवढा अपधाव कमी तेवढे जास्त पावसाचे पाणी शेतात मुरून पिकांना मिळू शकते. अपधाव झालेल्या पाण्यातून पिकासाठी उपयुक्त अन्नद्रव्ये वाहून जातात. मातीची धूप : अपधावामुळे पाण्याबरोबर जमिनीची धूप होते व सोलापूर येथे रब्बी ज्वारीवर केलेल्या प्रयोगात शेतातून प्रतिवर्षी एकरी सरासरी ४४ टन माती धुपून नाहीशी होते असे आढळले; मांजरी येथे ती एकरी २५ टन धुपून जाते. जमिनीवर नैसर्गिक तण उगवले असेल तर त्यामुळे धूप कमी (अंदाजे १ टन) होते, तर जमीन पड असल्यास किंवा मशागत केल्यास १८ ते २१ टन इतकी माती वाहून जाते. माती वाहून गेल्यामुळे जमिनीची खोली कमी होते व जमिनीचा उतार उत्तरोत्तर वाढत जातो. माथा, उतार व सखल भाग अशी प्रदेशाची ठेवण होत जाते व माथ्यावर हलक्या, उतारावर मध्यम खोल व सखल भागात माती वाहून आल्यामुळे खोल जमिनी आढळून येतात. जमिनीची खोली जेवढी जास्त तेवढी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. वर्गीकरण करण्यासाठी जमिनीची खोली हा महत्त्वाचा घटक ठरतो व उथळ ( ० ते ९ इंच) व खोल (१८ इंचांपेक्षा जास्त) असे जमिनीचा प्रकार मानले जातात. उथळ किंवा हलक्या जमिनीवर खरीप तर मध्यम खोल ते खोल जमिनीवर रब्बी पिके घेतली जातात. 'भारतातील कोरडवाहू शेती' या डॉ. कानिटकर यांच्या पुस्तकात अवर्षणप्रवण क्षेत्रातील हवामान, पर्जन्य, जमिनी, शिल्पकार चरित्रकोश पिके, पिकांना पाण्याची आवश्यकता या सर्व बाबींचे सविस्तर व कार्यकारणभावासह विवेचन केले आहे. जमिनीची धूप ही अनेक घटकांवर अवलंबून असते. उदा. जमिनीचा प्रकार, उतार, निचरा, पावसाची तीव्रता, जमीन पडीक अथवा मशागत केलेली अथवा पिकाखालील, पीक असल्यास- पिकाची धूप प्रतिबंधक्षमता इ. जमिनीवर धूप प्रतिबंध होण्यासाठी समतल पातळीतील बांध व अन्य भूमी संस्कार करता येतात. धूप प्रतिबंधक पिके उदा. मूग, हुलगा इ. व बाजरी - ज्वारीसारखी धूप प्रतिबंध न करणारी पिके यांची एकआड एक पट्टा पेर पद्धतीने समपातळीवर लागवड केल्यास धूप कमी होते. सोलापूर केंद्रावर कृत्रिम पर्जन्ययंत्र वापरून निरनिराळ्या माती प्रकारांवर निरनिराळ्या पर्जन्य तीव्रतेखाली किती धूप होते हे शोधून काढले व त्यावरून निरनिराळ्या जमिनींची धूप प्रतिबंधक्षमता मोजण्यात आली. या अभ्यासाचा उपयोग धरणाच्या लाभक्षेत्रातील जमिनींचे सर्वेक्षण ( उदा. कोयना, काक्रापार इ.), तसेच जमिनीवर करावयाचे धूप प्रतिबंधक संस्कार इत्यादी ठरवण्यासाठी करण्यात आला. समुद्राच्या पाण्यामुळे किनाऱ्यावरील 'खार' किंवा 'खाजण ' जमिनीवरून सर्वाधिक धूप होते असे आढळले आहे. जमिनीचा पोत, घडण, पाणी साठवण क्षमता : मातीच्या कणांच्या आकारावरून त्यांना वाळू, रेती व चिकणमाती या तीन प्रकारांत गणले जाते व जमिनीतील कणांच्या तुलनात्मक प्रमाणावरून जमिनीचा पोत ठरतो. प्रकर्षाने जाड कण जास्त असल्यास जमिनीस वाळूमय किंवा बरड, चिकणमातीचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त असल्यास चिकण किंवा भारी व चिकणमाती ३०% पेक्षा कमी व उरलेली वाळू/रेती असल्यास पोयटा असे म्हणतात. मध्यम खोल व खोल जमिनीत ४०% किंवा जास्त चिकणमाती असते व या चिकणमातीत माँटमोरिलोनाईट नावाचे दु खनिज असेल तर पाणी शोषून अशा जमिनी फुगतात. उन्हामुळे पाणी बाष्प होऊन निघून गेल्यावर त्या आक्रसतात, या प्रसरण व आकुंचन पावण्यामुळे जमिनीत भेगा पडतात. कणांच्या परस्परातील रचनेला जमिनींची घडण असे म्हणतात. उत्तम घडण असलेल्या जमिनीना फुलदार जमिनी म्हणतात व त्यामध्ये पिकांना योग्य असे हवा व पाणी असते. जमिनीचा पोत, घडण व दुय्यम खनिजे यावर जमिनीत पाणी मुरण्याचा वेग अवलंबून असतो. मध्यम खोल व खोल जमिनीत १३