पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड जातीच्या माशांची पिल्ले काही काळ संगोपित करून त्यांची वाढ झाल्यावर त्यांचा अन्न म्हणून वापर करण्याचा परंपरागत व्यवसाय या ठिकाणी चालतो. या संगोपनास आधुनिक संवर्धनाच्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास या क्षेत्रातून चांगल्या दर्जाचे, उच्च मूल्याचे निर्यातक्षम मत्स्योत्पादन होऊ शकते. यासाठी लागणारे संवर्धनाचे व बीजनिमितींचे तंत्रज्ञान राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालय व संशोधन केंद्राने विकसित केलेले आहे. आजमितीस ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुमारे २५ ठिकाणी कोळंबीसंवर्धन तलाव कार्यान्वित आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने या प्रकारच्या संवर्धन प्रकल्पांना चालना मिळण्यासाठी निमखारे पाणी मत्स्यसंवर्धन प्रकल्पही सुरू केला आहे. तथापि, काही कायदेशीरह्नबाबीह्रवह्नसंवर्धनयोग्यह्नजागाह्वमिळण्यातील अडचणींमुळे या क्षेत्रातील मत्स्यसंवर्धनास अद्याप गती आलेली नाही. ४.० : योगदान : राज्याच्या मत्स्योद्योगाची मागील पन्नास वर्षातील प्रगती वरीलप्रमाणे आहे. १९६०ह्नमधील वार्षिक १.५० लाख मे. टनांच्या मत्स्योत्पादनापासून २०१०ह्नपर्यंत ५.८२ लाख टनांच्या उत्पादनापर्यंत या व्यवसायाने वाढ केली आहे. राज्याच्या मत्स्योत्पादनाची ही प्रगती मासेमारी करणारे/संवर्धन करणारे मत्स्यकार, हा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी जागरूक असणारी शासकीय यंत्रणा आणि मत्स्य संपत्तीचा शास्त्रीय अभ्यास करणारी मत्स्यसंशोधन / शिक्षण यंत्रणा यांच्या बहुतांशी एकत्रित सहयोगातून प्रत्यक्षात आली आहे. या व्यवस्थापकीय संस्था व शैक्षणिक / संशोधन संस्थांमधील तत्कालीन प्रमुखांनी दूरदृष्टीने आखलेल्या योजना व संशोधन संस्थांमधील संशोधकांनी केलेले मूलभूत संशोधन यामुळेच ही प्रगती होऊ शकली आहे. या प्रगतीच्या शिल्पकारांपैकी काही महत्त्वाच्या व्यक्तींची ओळख बोधनीय ठरावी. ४.१ : डॉ. एस. बी. सेठना (१९४५ ते १९५४) : १९४५ साली स्थापन झालेल्या मत्स्यव्यवसाय संचलानयाचे पहिले संचालक डॉ. सेठना होते. इंग्लंडमध्ये सागरी जीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतलेल्या या शास्त्रज्ञाने मत्स्यव्यवसायास शास्त्रीय व तांत्रिक वळण दिले. मासळीच्या योग्य विनियोगासाठी बर्फाच्या वापरास प्रोत्साहन, शार्क जातीच्या मासळीच्या यकृतापासून शार्क लिव्हर ऑईल वेगळे शिल्पकार चरित्रकोश करण्याचे प्रक्रियाकेंद्र, मासळी उतरवण्यासाठी मुंबई येथे बांधलेल्या ससून डॉक या बंदराचे आधुनिकीकरण अशा अनेक कल्पक योजना त्यांनी आखल्या व अंमलात आणल्या. अनेक छंद असलेल्या या शास्त्रज्ञाने मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर 'तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र' व 'तारापोरवाला मत्स्यालया'ची निर्मिती केली. तारापोरवाला मत्स्यालय स्थापनेच्या वेळी संपूर्ण आशिया खंडातील पहिले- वहिले सागरी मत्स्यालय होते. या मत्स्यालयाचे उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पुढे मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळालेले पदव्युत्तर संशोधन केंद्र म्हणून नावाजले गेले. शोभिवंत माशांच्या पालनाचा छंद जोपासण्यासाठी डॉ. सेठना यांनी संशोधन केंद्रात 'बॉम्बे अॅक्वेरियम सोसायटी'ची स्थापना केली. मासेमारांना सहकारी क्षेत्रात एकत्रित करण्याची सुरुवात देखील डॉ. सेठना यांनीच केली. ४.२ : डॉ. चं.वि. कुलकर्णी (१९५४ ते १९६९) : डॉ. सेठना यांच्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी पुढील पंधरा वर्षे मत्स्यव्यवसाय संचालकपदाची धुरा सांभाळली. डॉ. सेठना यांच्याप्रमाणेच डॉ. कुलकर्णी यांनीदेखील इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण प्राप्त केले होते. सागरी मत्स्यव्यावसायिकांना सहकारी क्षेत्रात आणून त्यांच्या मच्छिमारी सहकारी संस्थांची निर्मिती करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्याचप्रमाणे सागरी मासेमारीसाठी नौकांचे यांत्रिकीकरण करण्याची योजनाही त्यांच्याच काळात सुरू झाली. मासेमारांच्या सामाजिक समस्येकडे डॉ. कुलकर्णी यांनी विशेष लक्ष देऊन त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू केल्या. मासेमारीच्या जाळ्यांच्या धाग्यांचे आधुनिकीकरण, यांत्रिकी मासेमारीचे प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, मासळीचा दर्जा चांगला राखण्यासाठी सहकारी क्षेत्रातील बर्फाच्या कारखान्यांची निर्मिती, मुंबई, खोपोली व पुणे येथे मत्स्यबीजनिर्मिती केंद्रांची स्थापना अशा अनेक पायाभूत योजना त्यांच्या काळात आखल्या गेल्या. या सर्व उपायांमुळे राज्याचे मत्स्योत्पादन २.४७ लाख मे. टनांपर्यंत वाढले. मुंबई येथील 'केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था' या मत्स्यशास्त्रातील पदव्युत्तर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे कार्यवाहू संचालक म्हणून देखील त्यांनी काही वर्षे अतिरिक्त कार्यभार सांभाळला. २१३