पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड या संबंधीचा एक अभ्यास, भेट व प्रशिक्षण यंत्रणेमार्फत केला गेला. संपर्क शेतकरी वर्गाने किती प्रमाणात ही शिफारस अवलंबली आहे, याचे सर्वेक्षण केले. त्याकरता ठरावीक पत्रके भरून घेतली. त्यावरून असे दिसले की, सुमारे ३४% शेतकरी कोरडवाहू रब्बी ज्वारीकरता वरखते वापरतात व त्याचे प्रमाण १८ किलो ते २७ किलो नत्र प्रति हेक्टरी होते. भेट व प्रशिक्षण विस्तार कार्यासाठी कृषी खात्याने स्वतंत्र कर्मचारी नेमले होते. प्रत्यक्ष शेतास भेट देऊन पिकांची परिस्थिती पाहून सल्ला दिला तर उपयुक्त होतो. तसेच विस्तार कार्यकर्त्यांना सतत प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करता येते हा फार महत्त्वाचा लाभ आहे. हवी ती माहिती तज्ज्ञांमार्फत मिळण्याची सोय झाली आहे. हा फार महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे. विस्तृत मार्गदर्शक प्रकल्प : संशोधक, शेतकरी आणि कृषि विस्तार कार्यकर्ते एकत्र आल्यास उत्पादनवाढीचे लक्ष्य गाठता येते हे 'राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना' आणि 'प्रयोगशाळेतून शेतीकडे' या दोन्ही प्रकल्पाद्वारे सिद्ध झाले आहे. याच कालावधीत (१९७५ - ९५ ) महाराष्ट्रात विस्तृत प्रमाणात मार्गदर्शक प्रकल्प (Pilot Projects) ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर घेण्यात आले. हे प्रकल्प प्रत्यक्ष शेतावर ५० हजार ते एक लाख हेक्टरवर प्रतिवर्षी राबवण्यात आले. वेळेवर निविष्ठांचा पुरवठा, प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि पाण्याचा योग्य वापर ही त्रयी त्यात महत्त्वाची होती. याचा अभ्यास करून निरनिराळ्या जिल्ह्यात काय होते आणि महाराष्ट्रात त्याचा एकत्रित काय परिणाम झाला हे तपासले गेले. १९६० हे वर्ष पायाभूत मानून हरभरा पिकात प्रतिहेक्टरी उत्पादन कसे वाढले हे खालील तक्त्यावरून स्पष्ट होते. उत्पादन किं./हेक्टर विस्तारशिक्षणासाठी छापील पुस्तिका शिवाय छोट्या फिल्म्स् व व्हिडिओचा वापर करता येतो. सभा, मेळावे, प्रदर्शने, आकाशवाणी व दूरदर्शनवरील भाषणे याद्वारे कृषषिविस्ताराचे काम प्रभावीपणे होऊ शकते. आता तर प्रत्येक कृषी विद्यापीठात ‘फोन इन'द्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या वर्ष १९६०-६१ % वाढ -- १९८०-८१ १९९०-९१ १९९४-९५ दर हेक्टरी हरभऱ्याचे उत्पादन ८४% नी वाढले हे महत्त्वाचे आहे. याच काळात ज्वारी (खरीप व रब्बी), गहू व हरभरा ३.३४ ३.३५ ५.३२ ६.१४ ५९.२८ ८३.८३ यांच्या हेक्टरी उत्पन्नात पथदर्शक प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते याची खालीव आकडेवारी उद्बोधक आहे. पायलट प्रकल्पामधील उत्पन्न (क्विं./हे.) पीक राज्याचे सरासरी उत्पन्न (क्विं./हे.) सन खरीप ज्वारी १२-१५ २७ (कोरडवाहू) रबी ज्वारी ५-७.५ २०-२५ गहू ११-१८ १८-२० हरभरा ५-९ १८-२० पायलट प्रकल्पाचे क्षेत्र १ लाख हेक्टर प्रतिवर्ष (सन १९७५-८० सरासरी) कोरडवाहू व बागायती ज्वारी १०,००० हेक्टरवर (१९८५-८६ सुमारे ५०,००० हेक्टर प्रतिवर्ष (सन १९७५-८० ) सरासरी बागायती, ३०,००० हेक्टरवर ( सन १९९०-९१ ) सरासरी शिल्पकार चरित्रकोश १९३