पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषीखंड कृषि - विस्तारशिक्षण सर्व कृषी संशोधनाचा अंतिम उपभोक्ता शेतकरी आहे. कृषी संशोधनात उपयुक्त असलेले तंत्र व मंत्र त्या उपभोक्त्यापर्यंत कसे पोहचवायचे, कोणत्या पद्धती त्याकरता उपयुक्त ठरतील हे पाहावयाचे आणि पोहोचवण्याचे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गास कसे, कोणते प्रशिक्षण व ते कशा प्रकारचे द्यायचे हे सर्व ठरवणारा विभाग म्हणजे कृषि - विस्तार. त्यात सर्वात सुलभ उपाय म्हणजे शेतकरी वर्गाच्या सभा, प्रात्यक्षिके, शेतावरील प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरता प्रशिक्षण असे विविध उपाय आज उपलब्ध आहेत. ही सर्व जबाबदारी सांभाळण्याची क्षमता असलेला विभाग म्हणजे कृषि - विस्तार विभाग. तंत्रज्ञान आणि ज्ञान प्रसारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता, सामाजिक परिस्थिती, शेतकऱ्यांची ज्ञानाची पातळी हे सर्व पाहावे लागते. केवळ चर्चात्मक ज्ञान न देता त्यासाठी प्रत्यक्ष हाताळणी (Self doing ) फार महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, बीजप्रक्रिया हे तंत्र घेता येईल. केवळ ज्ञान न देता प्रत्यक्ष करून पाहणे (ज्यात किती बी, किती औषध मात्रा, कसे करावे, त्या करता कोणती साधने वापरावीत आणि व्यवहारात कसे घडते.) जास्त उपयुक्त ठरते. विस्तारशिक्षण हे आता आपली स्वतःची तत्त्वप्रणाली, उद्दिष्टे, तत्त्वे, पद्धती आणि तंत्रासह एक स्वतंत्र विद्याशाखा (विषय) म्हणून विकसित झाले आहे. विस्तार कार्यकर्ते तथा ग्रामीण विकास कार्याशी निगडित असलेल्यांनी हे लक्षात घ्यावे की, विस्तार शिक्षण, त्याची तत्त्वप्रणाली, कार्यपद्धती व तंत्र हे केवळ कृषीक्षेत्रापुरतेच मर्यादित नसून पशु-वैद्यकशास्त्र, पशु-संवर्धन, दुग्धव्यवसाय, गृहविज्ञान, स्वास्थ्य, कुटुंब नियोजन इत्यादी क्षेत्रांना देखील अनुरूप ठरते. कृषि - विस्तार ही ज्ञानशाखा अत्यंत अलीकडील म्हणजे सुमारे गेल्या ६० वर्षातील आहे. १९५५च्या सुमारास या विषयाचा अंतर्भाव कृषी पदवी शिक्षणात केला गेला. तत्पूर्वी पारंपरिक पद्धतीने जसे चर्चा, प्रत्यक्ष शेतास भेट किंवा लिखित साहित्य याद्वारे कृषि-विस्तार केला जात असे. परंतु नवे शेतीतंत्र आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांची शैक्षणिक पातळी, आर्थिक क्षमता, सामाजिक स्तर यांचा क्वचितच विचार होत असे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रसार होत नसे हे लक्षात १८८ आल्यावर कृषि विस्तार हा नवीन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. हे करताना निरनिराळ्या प्रसार करण्याच्या पद्धती तसेच लिखित, मौखिक साहित्य तयार करणे, शेतक-यांशी चर्चा करणे, प्रत्यक्ष हाताळणी, तंत्रज्ञानातील त्रुटी, पुनरावलोकन (Feed cack) यांचा समावेश करण्यात आला. कृषी प्रात्यक्षिके, प्रदर्शने, भेटी इ. पारंपरिक पद्धतीबरोबर प्रचलित पद्धतीची तुलना नवीन तंत्राशी प्रात्यक्षिकाद्वारे केली जाते व यासाठी संख्याशास्त्राचा वापर करून प्रायोगिक त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे विस्तार पद्धतीची विश्वासार्हता पाहणे शक्य झाले आहे. या सर्व प्रकारात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. त्याचा उल्लेख करणे उपयुक्त होईल. व सुरुवातीच्या काळात कृषि विस्तार विषयाचा उद्देश आर्थिक सामाजिक बदल करून शेतकरी वर्गाचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होणे याला महत्त्व दिले गेले. शेतकरी व संशोधक यांच्यामध्ये अनुभवाची देवाणघेवाण व्हावी अशी संकल्पना होती. आज ही 'फीड ऑन' व 'फीड बॅक' ही संकल्पना आहेच. कृषि विस्तारशिक्षण ही संकल्पना भारतात प्रथम स्वीकारली, त्या वेळी युरोप व अमेरिकन पद्धती यांचा अभ्यास करून अमेरिकन पद्धतीची कृषि विस्ताराची संकल्पना मान्य करण्यात आली, की जी इतर देशांच्या तुलनेत सक्षम होती. ज्या वेळी विस्तारशिक्षणाचा उपयोग ग्रामस्थांना शिक्षित करण्यासाठी होतो, त्या वेळी त्याला औपचारिक शिक्षणाचे स्वरूप राहात नाही. या अनुषंगाने औपचारिक शिक्षण व विस्तारशिक्षणात बरेच फरक निदर्शनास येतात. जसे औपचारिक शिक्षणात शिक्षक बौद्धिकापासून सुरुवात करून प्रात्यक्षिकापर्यंत पोहोचतात, तर विस्तारशिक्षणात विस्तार कार्यक्रर्ते प्रात्याक्षिकापासून सुरुवात करतात व तद्नंतर बौद्धिक घेतात. औपचारिक शिक्षणात विद्यार्थी विषयांचे अध्ययन करतात तर विस्तारशिक्षणात शेतकरी कृषिविषयक समस्या सोडवण्यासाठी, त्यांचा अवलंब करताना अडचणींवर उत्तरे शोधून त्यात बदल करतात किंवा शास्त्रज्ञांना सूचना करतात. औपचारिक शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती अनिवार्य असते, तर विस्तारशिक्षणात शेतकऱ्यांची उपस्थिती ऐच्छिक असते. शिल्पकार चरित्रकोश