पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड बारमाही पिके पूर्णपणे साठवून ठेवलेल्या पाण्यावरच अवलंबून असतात. थोडक्यात अधिक जमीन लागवडीखाली आणावयाची असल्यास पाणी साठवून ठेवणे जरुरीचे आहे. साठवलेले पाणी शेतीस उपलब्ध करून देणे व त्याद्वारे लागवडीखालील क्षेत्र वाढवणे हाच मार्ग उपलब्ध आहे. भूपृष्ठावर पाणी साठवणे व भूपृष्ठाखाली पाणी साठवणे असे दोन पर्याय आहेत. भूपृष्ठावर पाणी साठवण्यासाठी विविध आकारांची धरणे बांधली जातात. पावसाचे पाणी झिरपून भूपृष्ठाखाली नैसर्गिकरीत्या साठवले जाते व ते साठलेले पाणी विविध तऱ्हेने खेचून भूपृष्ठावर आणले जाते व शेतीला उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे उपलब्ध झालेल्या पाण्याविषयीचे एकूण लागवडीच्या क्षेत्राच्या १७.९% क्षेत्रच पाण्याखाली येते ( २००९-१०) यातील ६५% क्षेत्र हे विहीर बागायतीचे आहे. धरणे बांधण्यावर आजपर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत तरीही ही परिस्थिती. सांख्यिकी माहिती सोबत (तक्ताक्र. १) दिली आहे. त्यावरून पाणीपुरवठा वाढवून लागवडीखालील क्षेत्र वाढवणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. तक्ता १ : महाराष्ट्रातील जलसिंचन स्रोत, निव्वळ व एकूण बागाईत क्षेत्र ( क्षेत्र '00 ' हेक्टरात) स्रोत १) विहिरीव्यतिरिक्त इतर १९६० - ६१ ४७६९ १९८०-८१ २०००-०१ ७७९६ १०४६६ २००४-०५ १०००७ साधनांनी भिजणारे क्षेत्र २) विहिरी ५९५३ १०५५३ १९१२२ १९४२४ ३) एकूण निव्वळ बागाईत १०७२२ १८३४९ २९५८८ २९४३१ ४) दुबार बागाईत १४७६ ५८०३ ६८८० ७२१९ एकूण बागाईत क्षेत्र १२१९८ २४१५२ ३६४६८ ३६६५०

शेती उत्पादन वाढवण्यासाठी दर एकरी उत्पादन वाढवणे हा दुसरा उपाय आहे. महाराष्ट्रात कृषी उत्पादने दोन गटात विभागली जातात. एक धान्य पिके व दोन व्यापारी पिके गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, तेलबिया, फळे इत्यादी पहिल्या वर्गात मोडतात, तर कापूस, ऊस, रबर इत्यादी दुसऱ्या प्रकारात मोडतात. गेल्या काही वर्षांत गहू, ज्वारी, तांदूळ यांसारख्या अन्नधान्याबाबत सर्व देश विशेषतः महाराष्ट्र परावलंबी झाला होता. दर एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विविध तऱ्हेने प्रयत्न झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्ससारख्या संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर कृषिमंत्री सी. सुब्रह्मण्यम्, कृषि - सचिव बी. शिवरामन्, डॉ. बी.पी. पॉल, डॉ. ए.बी. जोशी व डॉ. स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली हे प्रयत्न यशस्वी झाले. राज्य पातळीवर, शासकीय शेतकी खाते व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण या विभागांतील विद्यापीठे यांच्या साहाय्याने संशोधन व विस्तार योजनांद्वारे शेती उत्पादकतेत लक्षणीय वाढ करण्यात शिल्पकार चरित्रकोश आली. ही वाढ अन्नधान्याबाबत आठ ते दहा पट झाली. त्यामुळे राज्यातील लोकसंख्यावाढ व दरडोई उत्पन्नातील वाढ होऊनही अन्नधान्याबाबत राज्य बऱ्याच प्रमाणात स्वावलंबी बनले. टंचाई नाहीशी झाली. ही वाढ नुसतीच संख्यात्मक नव्हती, तर गुणात्मकही होती. मूळ मेक्सिको देशातील गव्हाचे वाण भारतात वापरण्यात आले व उत्पादनात प्रचंड वाढ झाली. येथील संशोधनाद्वारे गव्हाचा रंग, चव, दाण्याचा आकार, चमक, वजन अशा बाबतीतही सुधारणा घडवून आणण्यात भारतीय संशोधक यशस्वी झाले. तीच गोष्ट ज्वारी, बाजरी या धान्यांबाबतही अनुभवास आली. त्यांच्या संकरित जातीमुळे जनावरांचा चारा व मानवी अन्न यांची भरघोस वाढ झाली. त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. धान्यातील अन्नद्रव्ये वाढली. कमी पावसाच्या प्रदेशातही त्यांचा प्रसार होऊ शकला. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ राइस रीसर्च या संस्थेमार्फ तांदुळाचे नवीन वाण विकसित करण्यात आले. नवे वाण रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत व वाढलेले उत्पादन पेलण्याइतके रोपही सक्षम करण्यात संशोधक यशस्वी झाले. १६३