पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहित्य खंड अनुषंगाने स्त्रीचे स्थान असा अभ्यास ग्रंथभर दिसतो. एकाच वेळी संशोधक आणि ललितलेखिका या दोन्ही भूमिका त्या बजावत होत्या. त्यामुळेच ललितलेखनात संशोधकीय प्रज्ञा, सत्यान्वेषी पिंड दिसतो व संशोधकीय लेखनात भावगर्भता येते. १९३९ ते १९७० ह्या काळात मानववंशशास्त्र व साहित्य ह्या दोन्ही क्षेत्रांत इरावतीबाईंनी प्रगतीची शिखरे पादाक्रांत केलेली दिसतात. त्यांचे हे पुस्तक अमेरिकेतील विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून लावले गेले होते. सदर पुस्तकाला मानववंशशास्त्रातील तज्ज्ञ श्री. हट्टन यांची प्रस्तावना आहे. काळापुढती चार पाउले भारत सरकारने हिंदूकोडबाबत त्यांचे मत आजमावले होते. पुरुषांच्या द्वितीय विवाहाचे समर्थन करणारा त्यांचा लेख, गांधीहत्येनंतर प्रक्षोभाबद्दलचा त्यांचा लेख; ही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची उदाहरणे आहेत. १९५८ साल हे महर्षी कर्वे यांचे शताब्दी वर्ष. त्या वेळी मत विचारले असता, 'स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची जरुरी नाही' असे मूलगामी व प्रांजळ मत त्यांनी नोंदविले. कोणतेही संशोधन पूर्ण झाले असे त्या मानीत नसत. त्या विषयीचे पुस्तक लिहून पूर्ण झाले, तरी त्या विषयात नवीन काय मिळते, याबद्दल त्यांचा शोध चालू असे. दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी त्या माहितीचा अंतर्भाव पुस्तकात जाई. एकीकडे वेगवेगळ्या जातींचा अभ्यास, तीन हजार ग्रामनामांचा अभ्यास, एकूण एकोणीस विद्यार्थ्यांना पीएच. डी. चे मार्गदर्शन ही कामेसुद्धा सुरू होती. केला १९४७ साली दिल्ली सायन्स काँग्रेसमध्ये मानववंशशास्त्र विभागाच्या त्या अध्यक्षा होत्या. प्रागैतिहासाच्या आफ्रिका काँग्रेसमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व, कॅलिफोर्निया विद्यापीठातर्फे मानवंशास्त्रातील संशोधनामुळे लंडन विद्यापीठामध्ये आमंत्रित व्याख्यात्या, बर्कले येथेही व्याख्यात्या असे सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ डेक्कन महाविद्यालयाने ग्रंथालयामध्ये एक संदर्भविभाग ठेवला आहे. तेथे त्यांना मिळालेली प्रशस्तिपत्रके व पारितोषिके बघायला मिळतात. शिल्पकार चरित्रकोश कर्वे, इरावती दिनकर १९७३ मध्ये डेक्कन महाविद्यालयाने एक स्मृतिग्रंथ काढला होता. त्यात काकासाहेब कालेलकरांनी त्यांच्या समग्र कार्याचा आढावा घेणारा गौरवास्पद लेख लिहिला आहे. २००५ साली डेक्कन महाविद्यालयाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पुणे विद्यापीठाने त्यांच्या स्मरणार्थ समाजशास्त्र विभागाजवळ मानववंशशास्त्र वस्तुसंग्रहालय उभारले आहे. १९९१ मध्ये प्रदर्शन भरवले व १९९३ मध्ये संग्रहालयाला त्यांचे नाव देण्यात आले. येथील आदिवासी काळाविषयीचे दालन, लग्नखांब, मानवी उत्क्रांतीमधील टप्पे वगैरे अनेक गोष्टी अभ्यसनीय व आकर्षक आहेत. इरावतीबाईंनी ५०-६० वर्षांपूर्वी केलेले अंदाज म्हणजे आजची प्रत्यक्ष परिस्थिती आहे. त्यांच्या समाजशास्त्रीय, संशोधकीय लेखांचा सगळ्यांत प्रथम दर्जाचा मोठेपणा सांगावयाचा म्हणजे त्यांनी ५० वर्षांपूर्वी केलेले अंदाज तंतोतंत खरे ठरलेले आहेत. त्याबाबतीत एक-दोन विषयांचा उल्लेखही पुरेसा ठरेल. पहिली गोष्ट लोकसंख्या वाढीबाबत 'प्रजासंकोचच अपरिहार्य' हे त्यांचे मत होतेच. कुटुंबनियोजनाचे पुण्यातील पहिले केंद्र के. ई. एम. रुग्णालयामध्ये त्यांनी काढायला लावले होते. महाराष्ट्राची वास्तव व्याख्या, "ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र" अशी होय व महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गुजरात, कर्नाटक आणि संपूर्ण देश समजून घ्यायला हवा आणि आदिवासी समजल्याखेरीज आपला देश समजू शकत नाही. आदिवासींना वेगळे ठेवून फोडा व झोडा या ब्रिटिशांच्या नीतीची, फुटीरतेची त्यांना तेव्हाच कल्पना आलेली होती. आजचे आसाम ओरिसातील दंगे पहिले की, 'काळापुढती चार पाउलें' विचार करणाऱ्या इरावतींचे द्रष्टेपण कळते. शेवटच्या दिवसापर्यंत कार्यमग्न असतानाच ११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचे निधन झाले. संदर्भ : - डॉ. उषा कोटबागी १. कर्वे, इरावती; 'व्यक्ती आणि वाङ्मय', पद्मगंधा प्रकाशन, २००५. ६१ क