पान:शंकुछेद.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जा सार्वजनिक वाचवाताप) खेड, (पुणे) ५० २२॥ था फर्डस् हटन ह्या ग्रंथांतील शकुछेदाचे भाषा तर करावयास भारंभ केला, तेव्हा पाहूं लागलों तो शंकुछेद कसे करावे हे या ग्रंथात सांगितले नाही, ह्मणून देविदत् इटन ह्या ग्रंथांतील हा विषय वाचून थोडक्यात ह्या ग्रंथाच्या आरभी शंकूवे छेद कसे करावे याविषयी लिहिले आहे. ह्या ग्रंथांन जे काही संस्छन बाद आले आहेत ते प्रथमतः अंमकसे विलक्षण दिसतील खरे, परंतु तेच वहिवाटीत आले लणजे साधारण होऊन जातील. आतां कोणी ह्मणेल की असे विलक्षण शब्द लिहिण्याचे प्रयोजन काय, तर त्यास माझे इतकेंच सांगणे आहे की, शंकुछेद ह्या विषयावर ग्रंथ मराठी भाषेत मुबीच नाहीत, ह्मणून ह्याप्रकरणांत जे जे विशेष शब्द पाहिजेत ते परिपागंतील शब्दांत मिळत नाहीत. या नवीन शब्दांचा अर्थ उघड होण्याकरितां ग्रंथानव्यारख्या लिहिल्या आहेत,तेणेकरुन त्यांचा अर्थ समजण्याविषयी काही अडचण पडणार नाही. मेहरबान यंग साहेब ह्यांचा शंकु छेदावरील ग्रंथ वाचू न त्यातून पराबला, दीर्घबर्तुळ व है पर्बला ह्यांच्या आकृति काढण्याच्या दोन दोन रीती दर प्रकरणाच्या प्रारंभी लिहिल्या आहेत. .