पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) ज्योतिर्लिंगावर राजशेखर नांवाच्या भूपतीने एक देवालय बांधिलें. त्या देवालयाजवळ कालटी नांवाचे एक गांव होते. तेथें विद्याधिराज नांवाचा एक ज्ञानसंपन्न ब्राह्मण राहात असे. त्याला पुत्रसंतति नसल्याने तो त्या ज्योतिर्लिंगाची एकनिष्ठेनें सेवा करू लागला. पूर्ण श्रद्धेच्या योगानें श्रीशंकर विद्याधिराज ब्राह्मणास प्रसन्न झाले, व त्या ब्राह्म- णास स्वतःच्या नावाप्रमाणे कृति करणारा असा एक पुत्र प्राप्त झाला. त्या मुलाचे यथाशास्त्र जातकादि संस्कार करून शिवगुरु असें नांव ठेविलें. पुढे त्या मुलाचे उपनयन होऊन वेदशास्त्रपठण झाल्यावर लग्न झाले. त्याच्या पत्नीचे आयांबा असें नांव होते. ते पतिपत्नी आपल्या अग्निहोत्रादि गृहस्थाश्रमांत निमग्न झाले. बरेच दिवस झाले तरी पुत्रसंतान न झाल्यामुळे शिवगुरूस फारच खेद उत्पन्न झाला. व अपुत्रिकाला 'नापुत्रस्यलोकोस्ति ' गति नाही म्हणून वाईट वाटले. या गोष्टीने शिवगुरु एकदां सचिंत असतां त्यांची स्त्री आर्याबा म्हणते, महाराज, आपण वृथा शोक कां करतां? आपल्या हातांत काय आहे ? परमेश्वर सर्वसाक्षी आहे. आपले दु.ख त्याला माहीत आहे. तर तोच परमेश्वर आपले मनोरथ पूर्ण करील. तरी आपण त्यालाच शरण जाऊं. पुढे उभयतां पतिपत्नीने कडकडीत तपाचे योगाने शंकारची आराधना चालविली. एके दिवशी स्वप्नामध्ये शिवगुरूस श्रीशंकरांनी दर्शन दिलें, व ब्राह्मणाचे रूपाने तपाचे कारण विचारिलें. तेव्हां शिवगुरूने पुत्रप्राप्तीची इच्छा प्रदर्शित केली. श्रीशंकरांनी उलट विचारिलें की, तुला उत्तम व सर्वज्ञ असा एक पुत्र हवा, अथवा सामान्य प्रकृतीचे अनेक मुलगे पाहिजेत ? तेव्हां शिवगुरूनें एकच पण सर्वज्ञ असा पुत्र मागितला. तेव्हां । प्रत्यक्ष शंकरच तुझ्या उदरीं जन्म वेतील ' असे सांगून ब्राह्मणाच्या स्वरूपाने आलेले श्रीशंकर स्वप्नांतच अदृश्य झाले.