पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ अंक २ शेकूस्पियरक्कृत-नाट्यमाला. ( जेसिका खालीं येते ) लोरेन्झो- -- काय ? तूं आलीस का? चलाहो चला तर ( इतरांकडे पाहून ) तुझी जा आतां सोंगें घेणारी व बाकीची मंडळी तुमची वाट पहात असतील. ( लोरेन्झो जेसिका व सॅलॅरीनो. हे एका बाजूने जातात. ) व दुसऱ्या बाजूनें अन्टोनियो प्रवेश करितो. अन्टोनियो – तिकडे कोण आहेरे तो ? ग्रॅशियानो - काय ह्मणतोस, मित्रा ? - अन्टोनियो- अरे, इतका वेळ सारेजण, कोठें रे गेला होतां तुह्मी? आणखी ती बाकीची मंडळी कोठे आहेत? अरे, नऊ तर केव्हांच वाजून गेले. आमची सर्व मित्रमंडळी तुमच्याकरितां खोळंबली आहेत. आतां आज रात्रीं सोंगें बिंगें कांहीं एक नकोत. सध्यां वारा कसा अगढ़ीं अनुकूल आहे; आणि बर्सेनियो आतांच निघेन ह्मणत आहे, अरे तुमच्या शोधाला मी तर दहा विस जणांना पाठविले असेल. ग्रॅशियानो-ठीक आहे. तर आज कांहीं एक खेळ वगैरे न करितां आतांच निघून जावें हेंच चांगलें. ( जातात. )