Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण कांहीं, किंवा सर्व आवश्यक पदार्थ, खाण्याच्या सर्व जिनसांत थोड्या फार मानाने असतातच, पण त्यांचे यथायोग्य प्रमाण दुधाशिवाय इतर पदार्थात असत नाहीं, या करितांच भोजनांत नानाविध पदार्थांची आवश्यकता असते. दुधाशिवाय दुसरा कोणताही एकच पदार्थ खाल्ला तर मनुष्याचा निर्वाह चांगल्या रीतीने होणार नाहीं. एकट्या दुधाने मात्र काहींसा होईल, यास्तव, गोरसाचा अंश भोजनांत जितका अनुकूल असेल तितका चांगलाच. भाज्यापाले यांच्या योगाने अन्नास रुचि येऊन पचनक्रियाही चांगली घडते, यास्तव हे सर्व विचार मनांत आणून अन्नसामुग्रीची व्यवस्था ठेवावी. * भोजन आटोपल्यावर बैठकीच्या जाग्यावर बसून, सर्वांस तांबूल द्यावा, वे आपणही ग्रहण करावा. आपल्या देशांत तांबूलाची योजना केवळ मुखवासार्थच नाहीं. त्याच्या योगाने दुस-याचा सन्मान व आदर केला जातो, व मजलस बरखास्त झाल्याचा इशाराही तोच आहे. पानसुपारी होऊन कचेरी बरखास्त झाली झणजे, एकांतस्थली किंचित् पाव अर्धातास वामकुक्षी करावी, परंतु झोंप घेऊ नये. तदनंतर मुखमार्जन करून भागवतरामायणादि ग्रंथ