५० [ प्रकरण : व्यवहारपद्धति. आहे, असे समजून सामथ्र्यानुरूप ते जें काम करितील तेवढ्यावर संतुष्ट राहून हाताखालील माणसांची बद्दी न करितां,उलटा गौरवच करीत असतो. मनुष्याचे कर्तृत्व कार्यसंपादनानंतर सर्वांच्याच दृष्टोत्पत्तीस येते, पण कुशल पुरुषांस माणसाच्या वागणुकीची तन्हा, बोलण्याचालण्याची ढब, पाणीदार स्वभाव, उद्योग करण्याविषयी उत्साह, व श्रमसहिष्णुता इत्यादि गुणांची झाक दिसल्याबरोबर ते त्याच्या कर्तृत्वाचे धोरण मनांत आणून त्यावर कामगिरी सोंपवितात, व ती त्याने पार पाडली झणजे, त्याच्या गुणांप्रमाणे त्यास नांवारुपास चढवितात. हिभ्यास सहाणेवर घासून पैलू पाडण्यापूर्वी त्याचे तेज सामान्यजनांच्या नजरेस येत नाही, ते रत्नपारखीच ओळखू जाणत. कितीएक लोक नोकरांची पारख करण्याकरिता त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर एखादा दागिना टाकून तो, ते उचलतात की काय, हे त्यांस समजू न देतां छपून पहात बसतात, पण असे करणे फारच वाईट होय. अशा करण्याने आपण चांगल्या माणसास मुद्दाम मोहात पाडण्याचा यत्न करितो, असे होते. | धन्याच्या मनांतील आशय इंगिताने जाणून आज्ञा होण्यापूर्वीच कार्य करणारे, कामसू, अनुरक्त, मामाणिक, पायरीने वागणारे, बहुमानाने मिळालेल्या अल्प
पान:व्यवहारपद्धति.pdf/63
Appearance