४२ व्यवहारपद्धति. | [ प्रकरण शहाचा हुकूम होतांच माहुताने निशाणाचा मदोन्मत्त हत्ती आणून पुढे उभा केला. हे पाहतांच, जवळ एसाजी काळे उभे होते, त्यांस महाराजांनी इशारा केल्याबरोबर ते पुढे सरसावून हत्ती अंगावर सोडावा, असे सणाले, त्याबरोबर माहुताने हत्ती त्यांच्या अंगावर घातला. काळे यांनी हत्तीची सोंड तोडून त्याच्या मर्मस्थान तवारीचे पांच चार वार केले, तेव्हा हत्ती मागे फिरला. हे कर्म पाहून पादशहांनी तोंडांत बोट घातलें, व काळे आदिकरून सर्व फौजेस नांवाजून शिरपाव दिले. पुढे पादशहांनी महाराजांस आपले बाळाजी आवजी मुनशी आह्मांस देणे, ह्मणून आपली इच्छा दर्शविली, त्यावेळी महाराज सणाले की, एकएक माणूस मिळवून माळेस मणी लाविले आहेत, ते माळेचे मणी कसे काढितां येतील ? हे ऐकून पादशहा स्तब्ध झाले. राजकारणी पत्रव्यवहारांतील लेखनचातुर्यावरून पादशहाचे चिटणिसांवर मन बसले, यांत मोठेसे नवल नाहीं. परंतु प्रथमतः बाळाजी आवजी राजापूरच्या सुभेदारापाशी कारकून होते, त्यासमयी त्यांच्या अंगचा मुत्सदीपणा महाराजांस कळून येण्यास कांहीं मार्ग न १ काव्येतिहाससंग्रहातील मराठीसाम्राज्याची छोटी बखर पान ४६ पहा.
पान:व्यवहारपद्धति.pdf/55
Appearance