Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ २ . ] दिनचर्या. असा त्यांचा इमानी व स्वामीनिष्ठ स्वभाव पाहून शहाजी महाराजांनी त्यांचा तनखा सातशें होन केला होता. ह्या सर्व गोष्टी इतिहासप्रसिद्धच आहेत. | शहाजी राजे यांनी आपले दुसरे चिरंजीव व्यंकोजी राजे, हे चंवदा वर्षांचे असता, त्यांस रघुनाथपंत नांवाच्या एका कारकुनाच्या दिमतीस देऊन, त्यांची चंदावरच्या जाहगिरीवर स्थापना केली होती. हे रघुनाथपंतही मोठे तेजस्वी, विश्वासू, व स्वामीकार्यधुरंधर होते. ते दादोजीपंतांप्रमाणे व्यंकोजीराजांस शिकवणीच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांप्रमाणे पराक्रम करण्याविषयी नेहमी उत्तेजन देत असत. स्वपराक्रमाने कांहीं नवें संपादन न करितां, वडिलार्जित जहागिरीचा उपभोग घेऊन, अल्पसमाधानी बनणे, हे राजेलोकांस उचित नाहीं. उंद्रची ओंजळ, चार दाण्यांनी भरते, परंतु सिंहाचे पोट हत्तीचा छावा मारूनही भरत नाहीं. निरुत्साही समाधानवृत्ति अभ्युदयास विघातक आहे, असे त्यांचे १ असंतुष्टा द्विजा नष्टाः संतुष्टाश्च महीभुजः । सलज्जा गणिका नष्टा निर्लज्जाश्च कुलखियः ॥ हितोपदेश. २ सुपूरा वै कुनदिको सुपुरो मूषकाञ्जलिः । सुसंतोषः कापुरुषः स्वल्पकेनैव तुष्यति ।। ९ उद्योग, अ० १३३. ३ संतोषो वै श्रियं हन्ति तथानुक्रोश एव च । अनुत्थानभये चोभे निरीहो नाथुते महत. ॥ ३४ उद्योग. अ० १३४.