Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ . ] दिनचर्या. ३७ मोठ्या विश्वासाचीं नाजूक कामें बिनदिक्कत सोपवीत असत. शहाजी राजे कर्नाटकं प्रांताच्या बंदोबस्तांत गुंतले असता, त्यांनी आपली ज्येष्ठपत्नी जिजाबाईसाहेब, व अज्ञान चिरंजीव शिवाजी महाराज, या उभयतांस पुणेमांत आपल्या वतनाच्या जागी ठेवून, चिरंजिवांच्या विद्याभ्यासावर दादोजींची नजर असावी, अशी व्यवस्था केली होती, व त्याप्रमाणे दादोजींनीही महाराजांस घोडे फेरणें, दांडपट्टा खेळणे, व व्यवहारक्षता राखणे, इत्यादि गोष्टी फार आस्थेने शिकविल्या होत्या; परंतु, या सर्व शिक्षणापेक्षां दादोजीपंतांच्या स्वतःच्या वर्तनाचा कित्ताच महाराजांस फार उपयोगी पडला, असे त्यांच्या एकंदर कारकीर्दीकडे लक्षपूर्वक पाहिले तर स्पष्ट दिसून येते. दिल्ली व विजापूर येथील दोन बादशाहांशीं एक्या कालीच वैर बांधून, स्वान्याशिका-यांच्या दिवसांत नूतन संपादिलेले राज्य आबादीस आणध्याची हातवटी, मावळे आबाद करण्याची पंतांची पद्धत पाहूनच महाराजांस प्राप्त झाली, असे आह्मांस वाटते. दादोजीपंतांच्या न्यायी वर्तनाचा ठसा महाराजांच्या मनावर चांगला उठलेला असावा, असेही त्यांच्या चरित्रांतील कितीएक गोष्टींवरून दिसून येते. महाराजांचे मुख्य कारभारी अबाजी सोनदेव, हे मुलुखगिरी