आहे, ते त्यांनी समर्थविद्यालयास सर्व हक्क सुद्धा अर्पण केल्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे. संस्थेस जशी द्रव्याची तशीच चांगल्या माणसांची वाण असल्यामुळे, ग्रंथ छापविण्याचे सर्व काम करण्याबद्दल रा.पळनिटकर यांसच विनंति करावी लागली,व त्यांनी ते काम मोठ्या उल्हासाने केलें; ही त्यांनी संस्थेची सेवा केली आहे, असे झणण्यास हरकत नाही. त्यांची वृद्धावस्था व डोळ्यांचा अधूपणा याचा विचार केला असतां, या काम संस्थेवर त्यांचे पुष्कळ उपकार झाले आहेत. यांचे मोडी हस्ताक्षर अत्युत्कृष्ट आहे, व हल्लीच्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत झणजे एक अमोलिक व संग्रहणीय हस्ताक्षर आहे, व ते त्यांनी संस्थेत ठेवण्यास देण्याची व्यवस्था केल्यास शाळेचे प्रेक्षकांस शाळेबरोबर तेही पहावयास सांपडेल. या पुस्तकाची किंमत वाचल्यावर प्रत्येकास कळून येईलच, प्रारंभी दोनचार शब्द लिहिल्यास बस्स होतील. एकंदर पुस्तकांतील भाषा विषयास साजेल अशी प्रगल्भ आहे, व विवेचन पद्धतीही व्यवस्थित आहे. पूर्वीच्या धर्मग्रंथांतील ठिकठिकाणीं आधार दिलेले आहेत, त्यामुळे वाचकांजवळ सुभाषिताचा बराचसा संग्रह होतो. मधून मधून उदाहरणादाखल एतिहासिक गोष्टी दिल्या
पान:व्यवहारपद्धति.pdf/5
Appearance