२ . ] दिनचर्या. ३३ साहजिकच ऐक्यभाव बळावू लागून, देशाचे बल व तेज वृद्धिंगत होऊ लागते. राष्ट्राची एकी संकेताने होत नसते; ती देशांतील प्रत्येक व्यक्तीच्या उदात्त विचाराने व परस्परांच्या प्रेमभावानेच होणे शक्य असते. अशा रीतीने प्रातःस्मरण झाल्यावर आपल्या हितांविषयी चिंर्तन करून द्रव्यार्जनाचाही विचार करावा. तद्नंतर बहिर्दिशेस जाऊन मुखमार्जन व स्नान करावे. प्रकृति सशक्त व नीरोगी असेल तर शीतोदकाने स्नान करण्याचा परिपाठ राखणे चांगलें. स्नान केल्यानंतर ओल्या अंगावर वारा लागू देऊ नये; अंग चांगले पुसून कोरडे वस्त्र परिधान करावे. प्रकृति दुर्बल असेल तर उष्णोदकानें स्नान करावे, व वस्त्र परिधान केल्यावर आसनावर बसून, दुसरे विचार मनांत येऊ न देतां, एकाग्रचित्ताने संध्यावंदन व देवतार्चन, इत्यादि धर्मकृत्यें आटोपावीं. ती करितांना दांभिकपणा, छांदिष्टपणा व दीर्घसूत्रता करू नये, व वेठ वारल्यासारखेही करू नये. एकदा व्यवहाराची दीक्षा घेतल्यावर प्रहर प्रहर नाक धरून बसणे, किंवा टाळ कुटीत राहणे, योग्य नाहीं. व्यावहारिकांनी आपला व्यवहार यथान्याय व यथासांग . ३ कधिच्चापररात्रेषु चिन्तयस्यर्थमर्थवित् ? ।। ( असा नारदांनी धर्मराजास प्रश्न केला आहे. ) श्लोक ३०, सभापर्व, अ० ५.
पान:व्यवहारपद्धति.pdf/46
Appearance