या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३० व्यवहारपद्धति. || प्रकृत प्रकरणांत नीतीचे स्वरूप, तिची आवश्यकता व उपयोग, चतुर्विध पुरुषार्थ व त्यांचा अन्योन्याश्रय, नित्यकृत्यांत कालाची वाटणी व ती ठरविण्याची धोरणे, इत्यादि गोष्टींविषयी चार ठळकठळक विचार यथावकाश कथन केले. पुढील प्रकरणी दिनचर्येतील निरनिराळ्या कृत्यांविषयी सविस्तर ऊहापोह करण्याचा विचार केला आहे. प्रकरण पहिले समाप्त.