Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. २५ यांणी श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांस लिहून पाठविलेल्या दिनचर्येवरून सुज्ञांच्या ध्यानीं येईल. पुढे दिलेला कार्यक्रम व कालाची वाटणी पुष्कळांस सोयकर होईल,असे वाटल्यावरून दिली आहे. ती धंद्याच्या मानाने ज्यांस सोयकर नसेल, त्यांनी आपल्या सोयीस पडेल असा तींत बदल केल्यास कांहीं हरकत आहे, असें नाहीं. नित्यकृत्यांत कालाची वाटणी. > > >---- ५॥ ते ६, प्रातःकाल साडेपाच वाजता उठून स्वस्थचि त्ताने परमेश्वराचे ध्यान व नामस्मरण करावे आणि तद्नंतर आत्महिताची विचारणा करावी. ‘ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय चिंतयेदात्मनो हितं ? अशी स्मृति आहे. ६-६॥, शौचविधि, मुखमार्जन व स्नान वगैरे कृत्यें | आटोपावीं. ६॥७॥, ब्राह्मणांनी संध्यावंदन, पितृतर्पण, अग्निपूजा व देवपूजा वगैरे, व इतरांनी आपल्या वर्णा श्रम धर्माप्रमाणे देवतार्चन वगैरे. ७॥–८, शारीरव्यायाम.