Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० व्यवहारपद्धति. [ प्रकरण संपादिले जाण्यास परिमित स्वार्थत्याग, परोपकारबुद्धि, कष्ट सोसण्याविषयीं असामान्य धैर्य, व्यवहारदक्षता, कालाचा यथायोग्य व्यय करण्याचा गुण, निरलस स्वभाव, स्वधर्मनिष्ठा, बरेचसे इंद्रियदमन, व मनोनिग्रह, हे गुण अंगीं असावे लागतात. बरेचसे इंद्रियदमन ह्मणण्याचे कारण संसारी मनुष्यास रसरूपगंधादि विषयांचा सर्वथैव त्याग व सर्वांशी मनोनिग्रह होणें नाहीं, व असा सर्वथैव त्याग त्यांस इष्टही नाही. त्यांनी इंद्रियलालनांत अगदी लंपट न झाले व मनोविकारांस अनावर होऊ न दिले झणजे पुरे आहे. नीतियुक्त वर्तन घडण्यास वर सांगितलेले सद्गुण अंग असणे आवश्यक आहे खरें, तथापि ते असल्यानेच केवळ यथान्याय वर्तन घडेल असें ह्मणतां येत नाहीं. ते घडण्यास पुर्वोक्त सद्गुणांसमवेत धर्मार्थकामाविषयीं तारतम्यविचार ध्यानी आणण्याचे सामर्थ्यही असले पाहिजे. ज्या कर्माने निष्कलंक समुँद्धि प्राप्त १ उपस्थितरय कामस्य प्रतिवादो न विद्यते । अपि निर्मुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुनः ॥ ४५ ॥ उद्योगपर्व, अ० ३९. २३ समुच्छ्ये यो यतते स राजन्परमो नयः ॥ ११ ॥ सभापर्व, अ० ५५.