Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण तांना ? ह्मणून विचारिलें आहे. ज्या विरक्त पुरुषांना अर्थ व काम यांची तादृश अपेक्षा नसते त्यांचा सामान्यनीतीवर निर्वाह झाला तर कोण जाणे, परंतु जे धर्मार्थकामासहवर्तमान मोक्षाची इच्छा करितात, अशा संसारी गृहस्थांनी राजनीतीच्या चारी सडांस हात घातल्याशिवाय त्यांचा गुजारा होणार नाही. सामान्यनीतीचे ठायीं तारतम्य कमी असल्यामुळे कधी कधी ती धर्म करीत असतां तिजपासून अधर्म घडतो. समजा की “ अहिंसा परमो धर्मः ?? हें सामान्यनीतीचे एक तत्व हृदयांत वागवून सामर्थ्य असतां, बालहत्येच्या भयास्तव एकाद्या शस्त्रवैद्याने अडलेल्या बायकोची सोडवणूक केली नाहीं, किंवा पाणिवधाच्या भयास्तव एकाद्या शिपायाने माणसाचे पाठीस लागलेल्या वाघावर गोळी घातली नाहीं, किंवा एकाद्या गलबताच्या मालिमानें तुफानांत सांपडलेल्या गलबतावरील सर्व उतारूंच्या संरक्षणार्थ दहा पांच उतारूंस समुद्रात फेकून दिलें नाहीं, व सर्वांसहवर्तमान आपणांस ‘समुद्रास्तृप्यन्तु ' करून घेतले, तर हे वर्तन धार्मिकपणाचे ह्मणता येईल काय ? थोड्या अधमीने पुष्कळ धर्म जोडतो आहे तर तो अधर्म नव्हे. । १ एवमेव मनुष्येंद्र ! धर्म त्यक्त्वाल्पर्क नरः । बृहन्तं धर्ममाप्नोति स चुद्ध इति निश्चितम् ॥ ६७ ।। वनपर्व, अ० ३३.