Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण स्थाने हव्यकव्य संबंधी दानधर्म विद्वान् व ज्ञानी अशा भटभिक्षुकांस करावा. चुकतमाकत श्राद्धसंकल्प व रडतखडत चातुर्मास्यसंबंधी पूजा सांगण्यापुरतीच ज्यांची विद्वत्ता, यजमानीण बाईच्या पाकनिष्पत्तीची तारीफ करण्यांतच ज्यांचे प्राविण्य, व सोंवळ्याओवळ्याची लटकी वासवीस घालण्यांत तत्परता, अशा अर्धबोबड्या दांभिक भिक्षुकांस कधीही दानधर्म करू नये. भस्मोद्धूलितविग्रह व आकर्णमर्याद गंधलेपन, हें कांहीं विद्वत्तेचे प्रमाण नव्हे. ज्ञान व आचरण हेच विद्वत्तेचे प्रमाण शिष्टसम्मत आहे. । सर्व व्रतांपेक्षां स्त्रियांस पतिव्रत फार श्रेयस्कर मानलेले आहे. पतीच्या छंदाने वागणे, व पतीची शुश्रूषा करणे, हेच त्यांचे मुख्य व्रत असतां, तिकडे लक्ष न देऊन बायका दांभिकपणाने व छांदिष्टपणाने हसे होण्यासारखा वेडगळपणांचीं व्रतवैकल्यें व नेमधर्म करितात, यास काय ह्मणावें! अलीकडे चतुर्मासांत ब्राह्मणास रोज चाहा पाजून चातुर्मास्यसमाप्तीच्यावेळी पितळेची कोपबशी दान के १ ज्ञानोत्कृष्टाय देयानि कव्यानि च हवींषि च । न हि हस्तावसृदिग्धौ रुधिरेणैव शुचनः ।। १३२ ।। मनु. अ० ३ । १ भर्ता देव गुरुर्भत धर्मतीर्थब्रतानि च । तस्मात्सर्व परित्यज्य पतिमेकं समाचरत् ।। स्मृतिरत्नाकर,