Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ वें.] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २५९ आहे, त्यास लौकिकीदान सटलें असतां शोभण्यासारखें आहे. लग्ना कार्यात कोंडीमध्यें जी दक्षणा वांटतात, ती विपङ्ग्रस्तांच्या उद्धारार्थही नसते, व गुणांस किंवा विद्वत्तेस अनुलक्षूनही नसते. ती केवळ दक्षणा वाटणाराच्या नांवलौकिकावर अवलंबून असते, यास्तव असल्या प्रकारचे जे दान ते केवळ लौकिकी झटले पाहिजे. गृहस्थास अशा तिन्ही प्रकारचे दान करणे जरी आवश्यक आहे, तरी पहिल्या दोन प्रकारच्या दानांविषयी विशेष आदर असावा. तिस-या प्रकारचे लौकिकी दान बेताबाताने व जरा आवडत्या हातानेच करावे. मिथ्या लौकिकाच्या भरी भरून असल्या दानधर्माची चढाओढ करीत बसणे, हा द्रव्याचा अपव्यय आलीं समजतो. अन्नदान असो किंवा द्रव्यदान असो, ते पहिल्या प्रकारचे असेल तर निरक्षेप व सात्विक होय. वैदिक, शास्त्री, पुराणिक, व हरदास, इत्यादिकांपासून आपणांस सदुपदेश होऊन आपले मनोरंजनही होते, यास्तव त्यांस दिलेल्या द्रव्याचा आपणांस मोबदला मिळतो, झणून ते केवळ निरपेक्ष दान ह्मणतां येत नाही. तथापि असल्या दानांपासून विद्वान् व गुणी लोकांस उत्तेजन मिळून देशांत विद्वान् व गुणी लोकांची वृद्धि होते, या