Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वें. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. । | २४९ जकपणाचे उत्तर देऊ नये. व तेथे बसलें असतां हस्तपादादिकांचा अंगविक्षेप करूंनये. कारण उपस्थित झालें तरी मोठ्याने हँसू नये, व विचारल्या शिवाय मध्ये तोंड घालून बोलू नये. हीन वेषानेही असूनये, व नटवेगिरीचा किंवा वरचढपणा दिसेल असा डौली पोषाखही करूनये. प्रतिष्ठितपणास साजेल असाच वेष असावा. सोंगट्यागंजिफा खेळण्याचा प्रसंग आल्यास तो कांहीं तरी निमित्त सांगून टाळावा. अशा सलगीने आपणांकडे सुषमस्करेपणा येतो, व खेळांत बहुधा वादविवादाचा प्रसंग आल्यावांचून राहतच नाहीं. याशिवाय ज्या कामगाराशी आपला निकट संबंध पडतो, त्या कामगाराच्या वरिष्ठ अधिका-यांपाशीं व हुजूर कचेन्यांत आपलं वळण ठेवण्यास दक्ष असावे, असो, इतकावेळ इतरांशी कसे वागावें हें सांगितले. आतां आपलें आपल्याशी वर्तन कसे असावे, व दानधर्मादिकांविषयी विचार कसा असावा, या विषयी थोडासा | १ न चोष्ठौ न भुजौ ज.नू नच वाक्यं समाक्षिपेत् । सदा वानं च वाचं च ष्ठीवनं चाचरेच्छनैः ।। ३५ ।। | २ हास्यवस्तुषु चान्यस्य वर्तमानेषु केचित् । नाति गाढे प्रहृष्येत न चाप्युन्मत्तवसेत् ॥ ३६॥ | ३ नचानुशिष्याद्राजानमपृच्छन्तं कदाचन । तूष्णीं त्वेनमुपासीत काले समभिपूजयेत् ॥ १६ ॥ विराटपर्व. अ. ४