२२६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण अर्धवट जागा झाला आहे, व प्रस्तुत काल त्यास इंवचून खडखडीत जागे करीत आहे, तर मग अशा कालास प्रतिकूल कसे ह्मणता येईल ? या कालाच्या कृपर्ने त्याच्या डोळ्यांवरची झपड नाहीशी होऊन तो पूर्वपठित राष्ट्रीयशिक्षणाची उजळणी, आणि पाश्चात्य भौतिकशास्त्रे व कला यांचा नवा अभ्यास, करूं लागेल तर त्यास पाय धरून मागे कोण ओढू शकणार ? हा राष्ट्रपुरुष बलभीमा सारखा शक्तिमान व चिरंजीव आहे, यावर ईश्वराची कृपा आहे, हा पुराणपुरुष असून त्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रांची बारशीं व बारावे बघितले आहेत. त्याने मागे अनेक प्रसंग आजच्याहूनही विशेष घोर परिस्थितीचे तडाखे गुमान न बाळगिता सहज लीलेने सहन केले आहेत. यास्तव सध्याच्या परिस्थितीचे तडाखे सहन करून धिम्मेपणाने त्यास लोकशिक्षण खात्रीने चालवितां येईल. लोकांनी मात्र सद्यःस्थितीने पुढे केलेल्या बागुलबोवास भिऊन हिम्मत खचू देता कामा नये. विद्या सणजे केवळ लिहितां वाचतां येणे एवढेच नव्हे, किंबहुना ते येत नसतांही उपदेशादि अन्य उपायांनी मनुष्यास विचारशील, बहुश्रुत, नीतिमान्, व कार्यदक्ष बनवितां येईल. यास्तव सद्यःपरिस्थितीने राष्ट्रीयशाळांच्या प्रमतीस
पान:व्यवहारपद्धति.pdf/235
Appearance