२२३ ६ वें. ] कौटुंबिक विचार. कर्तृत्ववान्, व हिम्मतबहाद्दर असे कितीसे पुरुष आज शंभर वर्षांत सरकारी शाळांत शिकून तयार झाले आहेत ? फारच थोडे, पण ते देखील यदृच्छाप्रभावाने, शिक्षणप्रभावाने खास नव्हत. भांगेच्या मळ्यांत यदृच्छेने जसा एखाददुसरा तुळशीचा माडा रुजावा, त्याप्रमाणेच ही ईश्वरीघटना समजावयाची. अशा आपोआप रुजलेल्या एखाददुस-या तुळशीच्या मांड्याकडे बोट दाखवून कोणी भांगेच्या मळ्यास तुळशीची बाग ह्मणा ह्मणून सांगू लागला, तर ते कोण ऐकेल. दोनतीन हजार रुपये खर्च, व बारा पंधरा वर्षे उरस्फोड करून सरकारी शाळांपासून विद्याथ्याँस काय जोड लाभते, हे पाहू गेले तर इंग्रेजी पहिल्या दोन मुळाक्षरांचा व्यत्यास, (ए. बीचा व्यत्यास बी. ए) क्रियारहित वाक्पांडित्य, व भाकरीच्या तुकड्याकरिता * लांगूलचालनमधश्चरणावपातम् । भूमौ निपत्य वदनोदरदर्शनं च ॥ ” अशी श्ववृत्ति. धिक्कार असो, अशा अस्पृहणीय लाभास ! यास्तव विद्याथ्यांनी जवळ असलीनसलेली पुंजी, व तरुणपणची नवी उमेद व्यर्थ खर्ची न घालतां, राष्ट्रीयशाळांकडे धांव घ्यावी हैं। फार बरें. | एका शतकापूर्वी सर्वीस अभिज्ञात व त्या काली सर्व देशांत प्रचलित असलेले राष्ट्रीय शिक्षण, जे आज सु
पान:व्यवहारपद्धति.pdf/232
Appearance