१ लें.] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. । पाडीत असतात ह्यांत संशय नाही. अशा लोकांचे धर्मशास्त्र स्वार्थसाधनांत कांहीं पाप घडत असल्यास स्वार्थ साधून त्या पापाच्या क्षालनार्थ, एखादि एकादशिनी कर किंवा गाईस मूठभर चारा घाल झणजे झालें, असे सांगत असते. भीमानें धर्मराजास हेच स्वार्थसाधू धर्मतत्व सांगितले होते. या प्रच्छन्न पातक्यांचा, आपल्या अनीतीवर पांघरूण घालणारा दानधर्म गरीब लोकांच्या नीतिमत्तेस व उदात्त वर्तनास विरजण लावणारा असतो. अशा लोकांच्या स्वार्थपरायणतेमुळेच परस्परांमधील विश्वास उडून जाऊन सांपत जुटीची. फूट झाली आहे. आक्षेपकांच्या झणण्याप्रमाणे परकीय राजसत्तेमुळे आलेला कंगालपणा हाच जर अनीतिमत्तेला मुख्य कारण ह्मणावा, तर थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीनंतर जी अंगावर शहारे येण्यासारखी अनीतिमत्ता बळावली, ती कंगालपणामुळे बळावली, की परकीयांच्या राजसत्तेमुळे बळावली, ह्मणून ह्मणावी बरें ? आपल्या लोकांची अमर्याद वाढलेली स्वार्थबुद्धीच आपल्या अनीतिमत्तेला व तज्जनित निकृष्टावस्थेला कारणीभूत आहे, जपानच्या | १ अथवाऽन दुहे राजसाधने साधुदाहिने । सौहित्यदानादेतस्मादेनसः प्रति मुच्यते ।। ३५ ।। वनपर्व, अ० ३५
पान:व्यवहारपद्धति.pdf/22
Appearance