Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० व्यवहारपद्धति. [ प्रकरण कृष्णपरमात्म्यास देखील संसारांत खोटसाळपणाने वागावे लागले. पुरुषांस जर तुकारामबोवा व्हावयाचे, तर त्यांनी लग्ने करून दुस-याच्या पोरीबाळी कां नाडाव्या ! बायकांच्या अशा वेडगळपणाच्या जल्पना कानीं येण्यास पुरुषांची वागणुकच कारणीभूत होते. पुरुष जर शिस्तीने वागून भारदस्तपणा धरतील, तर अशा वेडगळपणाच्या वल्गना करण्यास बायकांचे काय तोंड लागले आहे. असो, सांपतकालीं मुलाबाळांस वागविण्याचा प्रकारही, बायकांस वागविण्याच्या वेडगळ प्रकाराप्रमाण अगदी भोपळसुती चालला आहे. पोरेबाळे अर्भकावस्थेत असतात, तेव्हां त्यांस विनोदाखातर शिव्या द्यावयास शिकवावयाचे, व पुढे ती बाल्यदशेत येऊन घरांतील माणसांस व शाळेतील सोबत्यांस, शिवीगाळ करू लागली झणजे कौतुक करावयाचे. किंवा आपल्या मुलाची कड घेऊन दुस-याच्या मुलास रागे भरावयाचे. किंवा फार झाले तर, लडिवाळपणाने आपल्या मुलांस हसत हसत लुच्चा लबाड ह्मणून, रागें भरल्याचा लटका आविर्भाव दाखवावयाचा. बाळपणीं असा ओळा असल्यावर तीच मुले वयांत आलीं ह्मणजे आईबापांची शोभा कशी राखीत असतील, याचा अंदाज वाचकांनीच करावा. शिक्षण संबंधाने पाहिले तरी, मुलाचे नांव शा