२०४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण यजमान नरम आहेत, की गरम आहेत, हे अजमावून पहाण्याचा घाट घातला. तिने आपल्या घोड्यास किंचित् टांच मारून ती थोडीशी जान्सन साहेबांच्या पुढे गेली, आणि त्यांस ह्मणू लागली कीं, तुह्मी आपला घोडा मागे राखून रेंगाळत येतां, त्याचा मला कंटाळा येतो, हे ऐकून साहेबमजकुरांनी आपला घोडा जरा जलदीने चालविला, त्याबरोबर ह्या बाईने मुद्दाम लगाम आखडून आपण मागे राहिली, आणि ह्मणू लागली कीं, तुह्मीं एकसारखे दवडत जातां त्यामुळे मजला त्रास होतो. हा बायकोचा चवढाळपणा जान्सन साहेबांच्या नजरेस आल्याबरोबर त्यांनी आपला घोडा एकदम भरधाव काढून, व तीस एकटी मागे सोडून, ते तिच्या अगोदर देवळांत जाऊन बसले. मागाहून ही बाईहो हिरमुसलें तोंड करून डोळे पुशीत पुशीत, देवळांत येऊन प्रविष्ट झाली, व त्या उभयतांचे लग्न लागले. ह्या पहिल्याच प्रसंगाने आपल्या नव-यापुढे आपले चाळे कितपत चालतील, या गोष्टीचा ह्या बाईस पक्का अंदाज लागून, तिने पुढे यावज्जन्म असले ढंग कधींही केले नाहींत. | वरील गोष्टी वरून पाश्चात्य लोकांतील स्त्रियांचे वर्चस्व किती दिखाऊ व नकली असते, व ते लोक आपल्या तेजस्वितेच्या योगाने त्या वर्चस्वाचा आपणास
पान:व्यवहारपद्धति.pdf/213
Appearance