Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण प्रमाणे भासणारी अनीति, व सद्वर्तना प्रमाणे भासणारे दुर्वर्तन, मनास लाजवीत नाहीं. । प्रस्तुत काली कापट्याने मुत्सद्दीपणाचा वेष घेतला आहे, आपमतलबाने व्यवहारदाक्षिण्याचे सोंग आणले आहे, स्वैरवर्तनाने व्यक्तिस्वातंत्र्याची भूमिका धारण केली आहे, व स्त्रीजितत्वाने अथवा बाईलबुध्या स्वभावाने अंग प्रतिष्ठितपणाचा आविर्भाव आणून दारपरिचर्या असे संभावित नामाभिद्मन स्वीकारले आहे, अशा प्रकारे नानाविध दुर्गुणांनी निरनिराळ्या सद्गुणांची नामरूपें धारण करून, लोकांच्या अंतरंगांत प्रवेश केला आहे. व तेथे त्यांस स्वागतपूर्वक वसतिस्थान मिळून, त्यांनी जो तेथे तमाशा मांडला आहे, त्या तमाशांत सध्या लोक आपलें देहभान विसरले आहेत. अशा प्रसंगी त्यांस भावाभावांनी एकत्र रहावे हा उपदेश गोड कसा लागणार ! वर निर्दिष्ट केलेले हलकट सोंगाड्ये जॉपर्यंत हृदयांत नांदत आहेत, तोपर्यंत मोठमोठी कुटुंबे सुयंत्रपणे एकत्र राहणे शक्य आहे असे मानणे, ही निवळ वेडगळपणाची समजूत आहे. यास्तव कालमानान्वये भावाभावांस वेगळे पडल्याशिवाय गत्यंतरच नाही, असे जर आहे, तर त्यांनी केवळ पूर्वाचाराच्या भिडस्तव अगदी एकमेकांची मने विटेपर्यंत लौकिकांत दर्शनी