Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ व्यवहारपद्धति. [ प्रकरण घासाघास सुरू होऊन कुटुंबे सफाई बुडाल्याची वारंवार हवीं तेवढी उदाहरणे दृष्टी पडतात. वेळूच्या बेटांत घासाघास सुरू होण्यास वायु जसा कारण होतो, तद्वत् कुटुंबांतील माणसांत घासाघास उत्पन्न होण्यास आप्पलपोट्या स्वभाव, निरंकुश वर्तनाची आवड, आणि स्त्रीजितत्व ह्या तीन गोष्टी मुख्यतः कारणीभूत होतात. ह्या तिन्ही दुर्गुणांस सार्वत्रिक प्रचारामुळे सांप्रत लोकोपहासाचे भय उरलें नाहीं. यामुळे तो अमर्याद वाढून कुटुंबांतील अत्यंत जिव्हाळ्याच्या माणसांत घासाघास सुरू होते, यांत नवल ते काय ? । | मनुष्यास दुर्वर्तना पासून निवृत्त करणारी तीन प्रकारची शासने असतात. पहिले राजशासन, दुसरे लोकशासन, व तिसरे धर्मशासन. या तिन्ही शासनपैकी पहिल्यापेक्षां दुस-याचा, व दुस-यापेक्षा तिस-याचा, अधिकारपदेश ज्यास्ती ज्यास्ती विस्तृत आहे. राजशासनास बारिकसारिक दुर्वर्तनांचा पत्ता लावून त्याचे नियमन करणे, अशक्य असते. यास्तव तें बारिक सारिक दुर्वर्तनाकडे, किंवा त्या वर्तनाच्या क्रियारहित वायफळ बोलण्याकडे लक्ष न पुरवितां, कांहीं विशेष १ यमदण्डभयाचित्पापाः पापं न कुर्वते । राजदण्डभयाकेचिरपरस्परभयादपि ।। महाभारत