१६६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण टांत क्लेश पावतो, व त्याचे पुढेही चांगले होत नाही. यास्तव आजच्या कष्टकालावरून पुढच्या कष्टतर कालाचे अनुमान करून सर्वांनी आजच सावध व्हावे, आणि प्रथमतः सद्वर्तनाने वागून आधीं देशहित करण्याची अंग पात्रता आणावी आणि नंतर आपल्या शिरावर लोकऋणाचे ओझे किती आहे ह्याचा पूर्ण विचार करून कुतज्ञबुद्धीने ते यथाशक्ति फेडण्याची उत्साहाने कंबर बांधावी. ॥ भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः । तस्मात् सर्वप्रकारेण ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ॥” असे नास्तिकपणाचे कोते विचार मनांत आणू नयेत. देह हाच आत्मा समजणे, व सदोदित त्याच्याच लालनांत मग्न असणे, हा आधीं कोता विचार, व त्या विचारावर सर्वांनी ऋण काढून ते फेडण्याची बुद्धि न ठेवितां दिवाळी करणे, हा तर फारच कोता विचार होय. असा बुडवेपणा धरल्याने कांहीं कालानें ऋणदाते सावकार कंगाल होऊन अणही मिळणार नाही, व घृतही मिळणार नाहीं. असो, लोक ऋणांतून मुक्त होण्याची पात्रता अंगीं आणण्याविषयीं, व ते फेडण्याची जबाबदारी मनांत वागविण्याविषयीं, आवश्यकता दाखवित असतां काय केल्याने ते फिटेल, याविषयी सामान्यत्वाने निर्देश झालाच आहे. अमुक अमुक केल्याने देशहित होईल, असे
पान:व्यवहारपद्धति.pdf/177
Appearance