Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवहारपद्धति. [ प्रकरण १६४ र्यादकालाच्या अनुभवाने मूढापेक्षां मूढासही पके समजून चुकले आहे, यामुळे ठाकूरकातकरी वगैरे रानटी लोकही रानांत टोळ्याटोळ्यांनी झोंपड्या बांधून एकजुटीने राहतात, जमातीने शिकार करतात, व रात्री एकोप्याने शेकूटीशीं नाचतमाशे करून मनोरंजन करितात, ह्यावरून अशा रानवट मनुष्यांस देखील समाजव्यवस्थेच्या फायद्यांचे अज्ञान आहे, असे ह्मणतां येत नाहीं. तर मग ते सुधारलेल्या लोकांस आहे, असे कसें ह्मणतां येईल ? यावरून देशहितास झटण्याची हयगय अज्ञानाने होत नाही. केवळ लुच्चेगिरीने होते. कांहीं अंगचोर मनुष्यांस कांहींएक न करितां दुस-याच्या मेहनतीचा आयता फायदा होत असलेला पाहून, सां प्रत बहुतेक लोक अंगचोरी करू लागले आहेत. कितीएक नीतीचे पाठबळ नसल्यामुळे देशबुडव्या स्वार्थी अधिका-यांच्या वक्रदृष्टीस भिऊन आपण स्वतः देशबुइवे व स्वार्थसाधु बनले आहेत. कितीएकांची अश समजूत झाली आहे की, ज्या गोष्टीची नुकसानी व अडचण कालांतराने अनुभवास येणार, त्या गोष्टीकरितां आज शरीराची व द्रव्याची झीज सोसण्यांत काय मतलब ? आमची व आमच्या पुत्रपौत्रांची हयात सध्या चालते आहे त्याप्रमाणे चालून निघून जाईल, पुढच्या